31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयभोंग्यावर दुटप्पी धोरणापेक्षा देशभरासाठी एक राष्ट्रीय धोरण निश्चित करा : संजय राऊत

भोंग्यावर दुटप्पी धोरणापेक्षा देशभरासाठी एक राष्ट्रीय धोरण निश्चित करा : संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारणात भोंग्यांवरुन मोठ्या प्रमाणात वादंग पेटलं आहे. भोंग्यांबाबत  देशभरासाठी एक राष्ट्रीय धोरण निश्चित करावं,असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. भोंगे कोणतेही असतील मशिदींवरील,मंदिरावरील किंवा रोज लावणारे राजकीय धोरण निश्चित करा. दिशानिर्देश देऊन कायदा निश्चित करा. सर्वांत आधी या भोंगाबंदीची सुरुवात बिहारपासून सुरु करा,असे इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप करणाऱ्या पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना केंद्राकडून संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Sanjay Raut’s appeal to Narendra Modi)

गोवंश हत्या बंदीचा एक कायदा बनवलात आणि काही राज्यांनी म्हणजे ईशान्येकडील राज्यांनी त्यातून पळवाट शोधली.ईशान्येकडील राज्य या  गोवंश हत्या बंदी बाबत विरोध करत आहेत. तुमच्या अधिपत्याखाली असणारे ईशान्येकडील राज्य तेसुद्धा मानायला तयार नाहीत. आणि इतर राज्यांवर जो दबाव आणण्यात आला आहे,याप्रकरची ड्यूएल पॉलिसी चालणार नाही. त्यामुळे भोंग्याबाबतही एक पॉलीसी करा. तुम्ही सतत म्हणता ना, एक विधान,एक संविधान, एक निशाण तर मग अशा तऱ्हेने ड्युएल पॉलीसी न करता भोंगा असो किंवा गोवांश हत्या यासाठी एक पॉलीसी करा ही शिवसेनेची भूमिका असून यासाठी पंतप्रधान मोदी यांना आवाहन केले असल्याचे संजय राऊत म्हणाले.

भाजपची झोप आता उडाली

भाजपची झोप आता उडाली आहे. बाळासाहेब ठाकऱ्यांची मशिदीवरील भोंग्यांची भूमिका सर्वांना ज्ञात आहे. त्यानंतर त्यावर अनेक कायदेशीर भूमिका आल्या ,सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तेव्हापासून महाराष्ट्रात कारवाया सुरु आहेत. आम्हाला भोंग्यांसंदर्भातून कोणाकडून अक्कल शिकवण्याची गरज नाही, असा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोला लगावला आहे.

बाळासाहेब भूमिका घेऊन थांबले नाहीत तर त्यावर एक तोडगा काढला

शिवसेना प्रमुखांनी सातत्याने मुस्लीमांसदर्भातले प्रश्न हे चर्चेतून सोडवलेले आहेत. जसं रस्त्यावरील नमाज ही १९८५ तील त्याकाळामध्ये या मुंबईतील एक समस्या होती. रस्त्यावर ट्राफीक,लोकांनी त्रास असे अनेक प्रश्न होते. आणि बाळासाहेबांनी आव्हान दिलं होत की, रस्त्यावरचे नमाज बंद करा, मशिदीवरील भोंगे उतरवा. बाळासाहेब भूमिका घेऊन थांबले नाहीत तर त्यावर एक तोडगा काढला.
जेव्हा महाराष्ट्रात भाजप- शिवसेना युतीचं सरकार आलं तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते.तेव्हा त्यांनी सर्वप्रमुख मौलवी आणि नेत्यांना भेटून सांगितलं की, मुंबईतील रस्त्यावरील नमाज बंद झाले पाहिजे, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

… म्हणून रस्त्यावरील नमाज पूर्णपणे बंद झाले

शिवसेना प्रमुखांनी मौलवीना तुम्ही रस्त्यावर का नमाज पडताय हे विचारलं तेव्हा ते म्हणाले मशिदी खूप लहान आहेत. त्यामुळे नमाज पडण्यासाठी आम्हाला जागा नाही . त्यामुळे थोडी मशिदीची जागा वाढवण्यासंदर्भात एफएसआय वाढवून द्या. त्यामुळे मशिदीची उंची वाढवून आम्ही नमाज रस्त्यावर पडणार नाही. त्यावेळी शिवसेना प्रमुख गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशी यांना बोलावून रस्त्यावरचे नमाज बंद करायचे असतील तर मौलवींच्या मागणीचा गांभीर्याने विचार करायला हवा. त्यानंतर मशिदींची एफएसआय त्यावेळी वाढवून दिला. त्यानंतर रस्त्यावरील नमाज पूर्णपणे बंद झाले हे सत्य आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

नुसतं भोंगे लावून, गोंगाट करून चालत नाही,तर…

पण नुसतं भोंगे लावून, गोंगाट करून चालत नाही. राजकर्त्याला त्यावर तोडगा काढावा लागतो. तो तोडगा काढण्याची हिंमत शिवसेनेमध्ये होती. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे स्वत:चे निर्णय स्वत: घेत होते. त्यांच्यावर कोणी विचार लादत नव्हते. ते आपल्या विचाराने स्वयंस्फूर्तीने निर्णय घेत होते.


हे सुद्धा वाचा : 

संजय राऊत यांनी पत्रकार म्हणून आपल्या यशाचे गमक सांगितल्यास, अन्य पत्रकारही आपली प्रगती करु शकतात

अखेर ईडीची संजय राऊतांच्या घरी धाड, मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त

“मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळे कुणालातरी पकडून…”, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा!

राज ठाकरे म्हणजे भाजपचे अर्धवटराव:  धनंजय मुंडे

श्रीलंकेसारखी परिस्थिती होण्याआधी जनतेने धर्मांध राजकारण बाजूला सारावे राष्ट्रवादीची नाव न घेता सरकरावर टीका

‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; रणवीर सिंह प्रमुख भूमिके 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी