27 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराजकीयशिंदे गटात गेलेल्या बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी सुरूच

शिंदे गटात गेलेल्या बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी सुरूच

टीम लय भारी

मुंबई : ज्या प्रकारे रोज शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत आहेत, त्याचप्रमाणे रोजच शिवसेनेतून बंडखोरांची हकालपट्टी होताना दिसून येत आहे. सोमवारी शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरून आणि शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. तर आज मंगळवारी (दि. १२ जुलै २०२२) रवींद्र फाटक यांची पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

शिंदे गटात गेलेल्या बंडखोरांची रोजच एकेक करून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गटात गेलेले बंडखोर देखील संतापलेले पाहायला मिळत आहेत. परंतु, खरी शिवसेना आमची आहे, त्यामुळे या हकालपट्टीला आम्ही मानत नसल्याचे या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याचवेळी शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख राजेश शाह यांची सुद्धा उचलबांगडी करण्यात आलेली आहे.

दरम्यान, अद्यापही शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधातील अपात्रतेच्या कारवाईवर न्यायालयाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण त्याआधीच शिवसेनेकडून या आमदारांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत रवींद्र फाटक यांनी सुरत गाठून बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या सुरतमधील भेटीनंतर स्वतः रवींद्र फाटक यांनी एकनाथ शिंदे यांना परत आणण्याऐवजी त्यांच्या गटात सहभागी होणे पसंत केले होते.

हे सुद्धा वाचा :

नगरपालिकांच्या निवडणुकांना ग्रहण; निवडणुका पुढे ढकलण्यासाठी भाजपचा पुढाकार

शिंदे गटातील आमदार म्हणतात ‘मंत्री पद कोणाला नकोय?’

अंबरनाथ नगर परिषदेतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार धक्का

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!