31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयशिवसेना 'महाविकास आघाडी'तून बाहेर पडण्यास तयार, पण बंडखोर आमदारांनी मुंबईत यावे :...

शिवसेना ‘महाविकास आघाडी’तून बाहेर पडण्यास तयार, पण बंडखोर आमदारांनी मुंबईत यावे : संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई : हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे आमदार बाहेर गेले आहेत. त्यांनी मुंबईत परत यावे. उद्धव ठाकरे साहेबांच्या समोर आपली भूमिका मांडावी. शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल, असा जाहीर ‘शब्द’ संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
संजय राऊत व निलम गोऱ्हे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांची वर्षा निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून सुटून आलेले नितीन देशमुख व कैलास पाटील या दोन्ही आमदारांनीही यावेळी त्यांनी आपला बिकट अनुभव पत्रकारांना सांगितला.

प्रकाश आबिटकर, प्रकाश सुर्वे अशा अनेक आमदारांनाही परत यायचे होते. पण त्यांना जबरदस्तीने ठेवण्यात आल्याचे नितीन देशमुख यांनी सांगितले. बंडखोरांपैकी 21 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असाही दावा संजय राऊत यांनी केला.
यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांनाही आवाहन केले. महाविकास आघाडीतून बाहेर पडायची तुम्हा सगळ्या आमदारांची इच्छा असेल तर तसा निर्णय घेतला जाईल. मी अत्यंत जबाबदारीने बोलत आहे. परंतु तुम्ही मुंबईत या. उद्धव ठाकरे यांच्यासमोर तो निर्णय बोलून दाखवा. मोबाईलवरून, वॉट्स अपवरून पत्रे पाठवू नका, असे आवाहन राऊत यांनी केले.

हे सुद्धा वाचा : आमदार उद्धव ठाकरेंची भेट घेतात, अन् तिथून गुवाहाटीला जातात हे आश्चर्यकारक : अनिल गोटे

उध्दव ठाकरेंविषयी सहानुभूतीची लाट,एकनाथ शिंदेंना शिव्यांचा भडीमार !

‘बंडोपंतां‘चा पंचतारांकीत हॉटेलांचा, चॅटर्ड विमानांचा खर्च करतयं कोण ?

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी