30 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराजकीयशिवसेनेच्या तालुका प्रमुखाने उद्धव ठाकरे यांना रक्ताने लिहिले पत्र

शिवसेनेच्या तालुका प्रमुखाने उद्धव ठाकरे यांना रक्ताने लिहिले पत्र

टीम लय भारी

बीड (अंबाजोगाई) : एकनाथ शिंदेंसह अनेक शिवसैनिकांनी बंड पुकारत स्वतःची वेगळीच सत्ता स्थापन केली आणि शिवसेनेला झटका दिला. आमदार गेले, खासदार गेले, अगदी नगरसेवक सुद्धा शिंदे गटात सामील झाले परंतु अनेक ठिकाणी शिवसैनिक मात्र शिवसेनेसोबत खंबीर उभे असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शिवसेनेच्या तालुका प्रमुखाने चक्क रक्ताने प्रतिज्ञापत्र लिहित आपली शिवसेनाप्रती निष्ठा व्यक्त केली आहे.

अंबाजोगाई येथील शिवसेनेचा तालुका प्रमुख अक्षय भुमकर याने स्वतःच्या रक्ताने प्रतिज्ञापत्र लिहून शिवसेनेसाठी समर्थन दर्शवले आहे. हे प्रतिज्ञापत्र त्याने सोशल मिडीयावर पोस्ट करीत त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांना टॅग केले आहे.

“पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नतृत्वाव विश्वास असून त्यांना माझा एक शिवसैनिक म्हणून बिनशर्त पाठींबा आहे. शिवसेनेच्या घटनेत नमुद उद्दिष्टे पुर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत”, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्रक अक्षय भुमकर याने पोस्ट केले आहे

सोडून जाणारे अनेक असले तरीही तेवढ्यात निष्ठेने शिवसेनेसोबत खंबीपणे पाठींबा दर्शवणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा…

किरीट सोमय्यांना शिवसेनेतील माहिती पुरवणारा ‘खबरी’ कोण ?

पुन्हा घात! नाशकात शिवसेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

एसटी बस दुर्घटना अपडेट, 12 जणांवर शोकाकूल वातावरणात आज होणार अंत्यसंस्कार

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!