30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजईडी विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा हेमंत पाटील यांची मागणी

ईडी विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा हेमंत पाटील यांची मागणी

रवींद्र भोजने : टीम लय भारी

सर्वसामान्य जनतेला एक न्याय आणि मंत्र्यांना दुसरा न्याय, अशा प्रकारचा भेदभाव होऊ नये, कायदा सर्वांना समान आहे त्यामुळे सायलेंट झोन चा गैरवापर करणाऱ्या मंत्र्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे.(Take action against the ministers who are protesting ministry against ED, Hemant Patil)

सायलेंट झोन कायद्याचा भंग करणाऱ्या मंत्री व पदाधिकाऱ्या वर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करणे बाबत व विना पोलीस परवानगी शिवाय आंदोलन करनाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी हेमंत पाटील यांनी सांगितले.

 24 फेब्रुवारी 2022 रोजी महाविकास आघाडीच्या मंत्री जय॔त पाटील छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील बाळासाहेब थोरात हसन मुश्रीफ धनंजय मुंडे सुभाष देसाई व अनेक मंत्री व आमदार यांनी मंत्रालया समोर महात्मा गांधींच्या पुतळ्या समोर पोलीस परवानगी न घेता व सायलेंट झोन या कायद्याचा भंग करून मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनात आंदोलन   केले.

तर भाजपाच्या प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील किरीट सोमया आणि अनेक पदाधिकाऱ्यांसह  मुंबई व महाराष्ट्रात बेकायदेशीर पोलीस परवानगीशिवाय आंदोलन केले  या सर्व पक्षांनी आपआपले वर्चस्व राखण्यासाठी आणि सर्व सामान्यांचा पाठिंबा मिळावा व आम्हीच किती स्वच्छ आहोत,  हे दाखवून देण्यासाठी प्रसार माध्यमा समोर शक्ती प्रदर्शन केले व ज्या काही राजकीय घटना घडत आहेत.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारच्या भाजपच्या भ्रष्टाचाराकडे किरीट सोमय्या चे लक्ष नाही, हेमंत पाटील

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यावर कोर्टात केस दाखल करणार, हेमंत पाटील यांची माहिती

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल

Sanjay Raut says Kirit Somaiya benefited from PMC scam, BJP demands proof

 त्या कायदेशीर मार्गाने घडत असताना या पक्षांनी शक्ती प्रदर्शन करणे अयोग्य आहे म्हणुन सायलेंट झोन चा भंग करणाऱ्या मंत्री व आमदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व भाजपाचे पदाधिकाऱ्यांसह सर्व व्यक्तीवर विना परवाना मुंबई व महाराष्ट्रात आंदोलन करणाऱ्यावर कङक पोलीस कारवाई करावी, अशी मागणी करीत मुखमंत्री  उद्धव ठाकरे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, मरीन लाईन्स पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे या पत्रकार परिषदेत हेमंत पाटील यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी