30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजबाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड, UIDAI च्या नव्या उपक्रमाबद्दल जाणून घ्या

बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड, UIDAI च्या नव्या उपक्रमाबद्दल जाणून घ्या

टीम लय भारी

नवी दिल्ली: सध्याच्या काळात अगदी सीमकार्ड, रेशनकार्डपासून ते जवळपास प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आधारकार्ड ही अनिवार्य गोष्ट आहे. भारताच्या रहिवाशांना योग्य प्रकारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक १२ अंकी क्रमांक दिला जाते त्याला आधार क्रमांक म्हणतात(Aadhar Card: Available as soon as the baby is born)

आधारकार्ड आता लहानग्यासाठी अनिवार्य आहे. ५ वर्षाखालील मुलांकडे आधारकार्ड असावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या मुलांना बाल आधारकार्ड दिलं जातं. मुलांच्या आधार कार्डला ‘बाल आधार कार्ड’ असे नाव दिले आहे आणि त्याचा रंग निळा आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचितची राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी

HDFC लाईफची निवृत्ती योजना, पॉलिसीच्या सुरुवातीलाच वार्षिक व्याज करा लॉक

याचा उपयोग शाळेत दाखला घेण्यापासून बँकेत खातं उघडण्यासाठी होतो. आता आधार कार्ड बनवणारी संस्था UIDAI ने देशात एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. ज्यामध्ये नवजात बाळाच्या जन्मासोबतच हॉस्पिटलमध्ये आधार नोंदणी करण्याची तयारी आहे.

UIDAI आणि रुग्णालयांनीही यासाठी तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत नवजात बालकाचं आधार तयार करत नव्हते. कारण वयानुसार बायोमेट्रिक बदल होत असतात. मात्र आता नवजात बालकाला जन्मासोबतच आधार नोंदणीही मिळणार आहे.

हिवाळ्यात ‘हे’ पदार्थ करणार तुमचे सर्दी, खोकल्यापासून संरक्षण

Home > World > NationalHyderabadNationalInternationalSpecialsGeneral LINKING VOTER CARD TO AADHAAR WILL HELP DELETE DUPLICATE VOTES: CEC

UIDAI चे सीईओ सौरभ गर्ग यांनी सांगितले की, “जन्माच्या वेळी बाळाचा फोटो क्लिक करून आधार कार्ड दिले जाईल. हे आधारकार्ड त्यांच्या पालकांपैकी एकाशी जोडले जाईल.५ वर्षापर्यंतच्या मुलांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत. जेव्हा मुलांचे वय पाच वर्षे पूर्ण होईल, तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक्स घेतले जातील.

देशातील ९९.७ टक्के प्रौढ लोकांची आधार अंतर्गत नोंदणी झाली आहे. त्यानंतर आता नवजात बालकांची नोंदणी करण्याचे आमचे ध्येय आहे. देशात दरवर्षी २ ते २.५ कोटी मुले जन्माला येतात. आम्ही त्यांची आधारमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करू.”

 “गेल्या वर्षी ग्रामीण भागात १० हजार शिबिरे घेण्यात आली. ज्यामध्ये सुमारे ३० लाख लोकांची आधार नोंदणी झाली आहे. त्याचबरोबर देशातील संपूर्ण लोकसंख्येला आधार क्रमांक देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरवर्षी सुमारे १० कोटी लोक आधारमध्ये त्यांचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर इत्यादी अपडेट करतात.”, असंही UIDAI चे सीईओ सौरभ गर्ग यांनी पुढे सांगितलं.

लहान मुलांसाठीही आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी किंवा कोणत्याही सरकारी योजनेत नोंदणीसाठी ते आवश्यक आहे. UIDAI ने पाच वर्षांखालील मुलांसाठी बायोमेट्रिक तपशीलांची आवश्यकता काढून टाकली आहे. आता या सोप्या प्रक्रियेचा अवलंब करून कोणताही पालक आपल्या मुलाचे आधार कार्ड बनवू शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी