36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजअल्पवयीन मुली वर अत्याचार, माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे नेते डी एम...

अल्पवयीन मुली वर अत्याचार, माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे नेते डी एम बावळेकर यांच्या दोन पुत्रांचा गुन्ह्यांमध्ये समावेश

टीम लय भारी

 महाबळेश्वर : महाबळेश्वर परिसरामध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात दोन दिवसापूर्वीच दोन संशयित आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर बलात्कार व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. (Atrocities on minor girls, two sons of former mayor and Shiv Sena leader DM Bawalekar involved in crimes) 

यामध्ये मुख्य संशयित आरोपी सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड व आशुतोष मोहन बिरामणे  यासह महाबळेश्वर तालुक्याचे  महाबळेश्वर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष  व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डी एम बावळेकर यांचे चिरंजीव सनी उर्फ सात्विक दत्तात्रेय बावळेकर यांचा सहभाग असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

आत्महत्या करणाऱ्यांचा मृत्यू कोविड मुळेच, केंद्राचे सुप्रीम कोर्टात वक्तव्य

T -20 क्रिकेट वर्ल्डकप मध्ये तालिबान अफगाणिस्तानला खेळवणार? तालिबानची नरमाई परंतु घातली एक अट

महाबळेश्वर तालुक्यातील  मोल मजुरी करून चरितार्थ चालवणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर आबा उर्फ सागर हनुमंत गायकवाड व आशुतोष मोहन बिरामणे यांनी लैंगिक अत्याचार केले. तसेच पीडित अल्पवयीन मुलीबरोबर वारंवार अत्याचार केले यामुळे सदर मुलगी या अत्याचारांमध्ये प्रेग्नेंट राहिली. काही दिवसापूर्वी घरी त्या मुलीची प्रसुती करण्यात आली.

या पीडितेने एका मुलीला जन्म देखील दिला या नवजात मुलीस मुंबई येथील चौरसीया  कुटुंबाकडे देण्यात आले होते. यामध्ये पीडित अल्पवयीन मुलीची आई व नातेवाईक  आरोपी कक्षात समावेश आहे.

या प्रकारांमध्ये महाबळेश्वर तालुक्याचे माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांच्या दोन्ही मुलांचा प्रामुख्याने सहभाग असल्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचाराला  व आरोपीने केलेल्या अत्याचाराला पाठबळ देण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. अनैतिक संबंधातून निर्माण झालेले नवजात बालक मुंबईच्या चौरासिया कुटुंबीयांना विकण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

 जन्मलेल्या मुलीच्या जन्माबाबत ची माहिती लपवण्याचा हेतूने नवजात मुलीला मुंबईतील चौरासिया कुटुंबाकडे देण्यात आले होते या घटनेची कुठेही कानोकान खबर देखील सांगण्यात आली देखील नव्हती.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि त्यामधून जन्मलेल्या नवजात बालकाला परस्पर बेकायदेशीर प्रक्रियेतून दत्तक प्रक्रिया न बजावता विक्री करणे असे गुन्हे दोन संशयित मुख्य आरोपी सह इतर अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अधिक तपास महाबळेश्‍वर तालुक्याचे पोलीस निरीक्षक भागवत करत आहेत.

इम्पिरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारची असमर्थता

Atrocities
अल्पवयीन मुली वर अत्याचार, माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे नेते डी एम बावळेकर यांच्या दोन पुत्रांचा गुन्ह्यांमध्ये समावेश

Congress supports Uddhav’s demand for Parliament session to discuss atrocities against women

माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे नेते यांचे सुपुत्र योगेश बावळेकर यांच्यावर महाबळेश्वर पोलिस स्थानकामध्ये यापूर्वी अश्लील चित्रफिती व फोटो व्हाट्सअप ग्रुप वर टाकल्यामुळे त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे यानंतर अल्पवयीन मुलीच्या अत्याचारा प्रकरणांमध्ये आता दुसरा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने महाबळेश्वर मध्ये एकच खळबळ माजली आहे

आनंद हिरालाल चौरशिया वय 45 डहाणुकर वाडी कांदिवली वेस्ट ,पूनम सुनील चोरासिया, रश्मी साधना मुबंई, सुनील हिरारलाल चोरासिया मुबंई  सुनिता रघुनाथ कदम वय 58 राहणार महाबळेश्व,र संजय कुमार रामचंद्र जंगम गुरुजी मरी पेठ महाबळेश्वर ,मंजूर रफीक नालबंद राहणार गवळी मोहल्ला महाबळेश्वर ,अनुभव कमलेश पांडे राहणार प्रतापगड लालगंज उत्तर प्रदेश ,घनश्याम फरांदे राहणार तामजाई नगर सातारा ,प्रभाकर रामचंद्र हिरवे ,राहणार लॉडविक पॉईंट जवळ महाबळेश्वर असे एकूण 13 जणांच्या विरोधात महाबळेश्वर पोलिस स्थानकामध्ये पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये मुख्य आरोपी सागर गायकवाड व आशुतोष बिरामणे संजय कुमार जंगम घनश्याम फरांदे प्रभाकर हिरवे यांना महाबळेश्वर पोलिसांनी अटक केली आहे बाकी आरोपी ताब्यात घेणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले यासाठी मुंबई येथे देखील महाबळेश्वरचे पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीला मुंबई येथील चौरासिया कुटुंबीयांना अवैधरित्या दत्तक प्रक्रिया राबवणाऱ्या कायदेपंडित यांनादेखील भोगावी लागणार जेलची हवा 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी