32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeटॉप न्यूजचिपी विमानतळ सज्ज, पहिले उड्डाण ९ ऑक्टोबरला

चिपी विमानतळ सज्ज, पहिले उड्डाण ९ ऑक्टोबरला

टीम लय भारी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ उड्डाणसाठी सज्ज झाले आहे. येत्या ९ ऑक्टोबर रोजी विमानतळाचे उद्घाटन होणार असून, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योर्तिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानातळाचे उद्घाटन होणार आहे (Chipi airport in Sindhudurg district is ready for flight).

नारायण राणेंच्या आव्हानाला सुभाष देसाईंचे प्रतिआवाहन

मुख्यमंत्र्यांनी साधला कोकणवासियांशी संवाद, विकासकामे करण्याची दिली हमी

मंत्रालयातील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात चिपी विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी या आढावा बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते ( Chipi airport work was reviewed in the chamber of industry minister Subhash Desai in the ministry).

Chipi Airport ready for flight, inaugurated on October 9
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात चिपी विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या कामाची माहिती दिली. उड्डाणासाठी चिपी विमानतळ पूर्णपणे सज्ज झाले आहे तसेच उद्घाटन प्रसंगी येणाऱ्या विमानाचे बुकिंग पूर्ण झाले आहे, असे यावेळी सांगण्यात आले (Chipi Airport is fully geared up for flight).

शिवलीलाला झाले अश्रू अनावर, फॉलोअर्स देखील आहेत नाराज

Sindhudurg: Chipi Airport receives aerodrome licence from DGCA – Here’s when commercial flight operations will start (freepressjournal.in)

Chipi Airport ready for flight, inaugurated on October 9
या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंह, महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे दीपक कपूर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी आदी या बैठकीला उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी