32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeटॉप न्यूजबाबा रामदेवसह चौघांविरोधात एफआयआर

बाबा रामदेवसह चौघांविरोधात एफआयआर

 टीम लय भारी

जयपूर :  बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ करोनिल औषधीवरून रामदेव बाबासह त्यांचे सहकारी चांगलेच गोत्यात आले आहे. या औषधावरुन आता जयपूरमध्ये बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

करोनिल औषधाच्या सेवनामुळे रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. मंगळवारी बाबा रामदेव यांनी समारंभपूर्वक करोनिल औषधाचे लाँचिंग केले. “करोनावर १०० टक्के लागू होणारं औषध आणि ७ दिवसांत करोना बरा होईल,” असा दावाही रामदेव बाबा यांच्या पतंजलीने केला होता. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने या औषधाच्या चाचण्यांचे सर्व रिपोटर्स मागवले तसेच करोनामधून मुक्ती देणारे औषध अशी जाहीरात बंद करण्याचेही आदेश दिले.

यांच्यावर झाला एफआयआर…

जयपूरच्या ज्योती नगर पोलीस ठाण्यात बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण, शास्त्रज्ञ अनुराग, एनआयएमएसचे चेअरमन बलबीर सिंह तोमर आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरोधात करोनिल औषधावरुन दिशाभूल करणारा प्रचार केल्याबद्दल एफआयर नोंदवण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी