29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटॉप न्यूजभारतीय पुरूष हॉकी संघाचा बेल्जिमकडून उपांत्य फेरीत पराभव

भारतीय पुरूष हॉकी संघाचा बेल्जिमकडून उपांत्य फेरीत पराभव

टीम लय भारी

टोकियो :-  भारतीय पुरुष हॉकी संघाचा बेल्जियमच्या संघाने पराभव केला आहे. बेल्जियमने भारतावर 5-2 अशा फरकाने विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताला उपांत्य फेरीत पराभव मिळाला आहे. भारतीय संघाचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे (Indian mens hockey team loses to Belgium in semi-finals). 

भारतीय हॉकी संघाचे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. असे असले तरी भारताला कांस्य पदक मिळण्याची आशा ही कायम आहे. कांस्य पदक मिळवण्यासाठी भारताला आणखी एक सामना खेळायला मिळणार आहे. त्यामुळे कांस्य पदक भारताच्या झोळित पडण्याची शक्यता आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या विजयानंतर माजी कर्णधार वीरेन रसकिन्हा भावुक…

भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास; असा मिळवला विजय

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणही भारत विरुद्ध बेल्जियम यांच्यातील उपांत्य फेरीतील हॉकीचा सामना पाहात आहे, असे ट्विट करून सांगितले होते. त्याचबरोबर त्यांनी भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा ही दिल्या होत्या.

भारताने न्यूझीलंड विरोधात झालेल्या सामन्यात 3-2 या फरकाने विजय मिळवून आपल्या प्रवसाची सुरुवात केली होती. परंतु पुढच्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 7-1 असा पराभव केला. पण मनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने स्वतःला सावरत चांगली कामगिरी केली (But under the leadership of Manpreet Singh, the Indian hockey team did well).

दिवंगत विलासराव देशमुखांची आठवण येतेय, अन्यायग्रस्त एका कुटुंबाची कैफियत

HERSTORY: The 16 who scripted Indian women’s hockey history

Indian mens hockey team loses to Belgium in semifinals
भारतीय पुरूष हॉकी संघ

यानंतर भारताने स्पेनला 3-0 अशा फरकाने मात दिली. तर अर्जेंटिनाचा 3-1 ने पराभव केला. त्याचबरोबर जपानचा 5-3 असा पराभव करत भारताने उप – उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर उप – उपांत्य सामन्यात भारताने ब्रिटनला 3-1 ने धुळ चारीत उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते.

भारताचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतीय संघाचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. परंतु, तरीही संघ कांस्यपदकाचा दावेदार आहे. भारताने पहिल्या हाफमध्ये चांगला खेळ केला. तर बेल्जियम शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताला खूपच वरचढ ठरला. पेनल्टी कॉर्नर हे भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे.

भारताला आता कांस्य पदकासाठी खेळावे लागणार आहे. भारतीय संघ कांस्यपदकासाठी जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पराभूत संघाचा सामना करेल. सेमी फायनलमध्ये विजय मिळवता आला नाही पण आता भारतीय संघाने कांस्य पदक तरी जिंकावे, अशीच अपेक्षा भारतीय फॅन्स करत आहेत (Indian fans are expecting the Indian team to win at least a bronze medal).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी