33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजरेल्वेने बदलले ऑनलाइन तिकिट बुकिंगचे नियम,

रेल्वेने बदलले ऑनलाइन तिकिट बुकिंगचे नियम,

टीम लय भारी

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांसाठी रेल्वे अनेक सुविधा राबवत असते. मात्र रेल्वेच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल देखील होत असतात.भारतीय रेल्वेने आता प्रवाशांसाठी नवीन नियम लागू केले आहे. ज्या प्रवाशांनी दीर्घ काळापासून ऑनलाइन तिकिट बुकिंग केलेली नाही अशा प्रवाशांसाठी हे नियम आहेत(Railways changed the rules of online ticket booking)

प्रवाशांनी हे नियम लक्षात घेण्याची गरज आहे अन्यथा त्यांना तिकिट बुकिंग करता येणार नाही. जे आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन तिकिट बुकिंग करतात त्यांना आता मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे तिकिट मिळू शकणार आहे.

तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये जखमी झालेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन

मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील इमारतींबाबत धक्कादायक खुलासा

रेल्वेचा नवा नियम

रेल्वेने त्या प्रवाशांसाठी नवा नियम लागू केला आहे ज्यांनी दीर्घकाळापासून ऑनलाइन तिकिट बुकिंग केलेली नाही. अशा लोकांना आधी त्यांचा मोबाइल नंबर आणि ईमेल व्हेरिफाय करावा लागेल त्यानंतरच ते आयआरसीटीसीच्या वेबासाइटवरून तिकिटे विकत घेऊ शकणार आहेत.

हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तिकिट बुक करता येणार आहे. जे प्रवासी नियमितपणे तिकिटे बुक करत आले आहेत त्यांना या प्रक्रियेतून जावे लागणार नाही.

मनसेच्या डॅशिंग महिला नेत्या रूपाली पाटील शिवसेनेच्या वाटेवर?

IRCTC announces change in directorate

हा नवीन नियम का बनवला

कोरोना संकटानंतर आता ट्रेन सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत तिकिटांच्या विक्रीत वाढ झाली आहे. सध्या २४ तासात आठ लाख रेल्वेची तिकिटे बुक होतात. मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळेस आणि त्याआधी आयआरसीटीसीच्या पोर्टलवरील जे अकाउंट निष्क्रीय झाले होते त्यांची खातरजमा करून घ्यायची आहे.

हे व्हेरिफिकेशन कसे होणार?

जेव्हा तुम्ही आयआरसीटीच्या पोर्टलवर लॉगिन कराल तेव्हा व्हेरिफिकेशनची एक विंडो ओपन होते. त्यात तुमचा आधीच नोंदवलेला मोबाइल नंबर आणि ईमेल टाका. त्यानंतर तिथे डाव्या बाजूला एडिटचा आणि उजव्या बाजूला व्हेरिफिकेशनचा पर्याय येईल.

एडिट पर्याय वापरून तुम्ही आपला ईमेल किंवा मोबाइल नंबर बदलू शकाल. त्यानंतर व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. त्यानंतर तो ओटीपी टाका. यानंतर तुमचा मोबाइल नंबर व्हेरिफाय होईल. याचप्रमाणे ईमेलदेखील व्हेरिफाय करण्यात येईल. ईमेलवर ओटीपी पाठवून तो व्हेरिफाय केला जाईल.

याशिवाय रेल्वे विभागानुसार, जर तुमच्याकडे कन्फर्म रेल्वे तिकीट असेल तर तुम्हाला रिझर्व्हेशन केलेलं तिकीट रद्द करण्याचं असेल तर जर चार तासपेक्षा कमी वेळ तुमच्याकडे राहिला असेल तर तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही. चार तासपेक्षा अधिकचा वेळ तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 50 टक्क्यापर्यंत रिफंड मिळू शकतो.

म्हणजेच तिकीट रद्द करायचा असेल तर तुम्हाला वेळ डोक्यात ठेवावी लागेल. जर तिकीट कन्फर्म आहे आणि रेल्वे सुटण्याच्या 12 तास आधी आणि 48 तास आधी तिकीट रद्द केलं तर रेल्वे प्रति प्रवाशांच्या तिकीटाच्या एकूण मुल्यातून 25 टक्के किंवा तिकीट रद्द केल्यास प्रति प्रवाशी 60 रुपयांपेक्षा जास्त शुल्क भरावे लागेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी