29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजतामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये जखमी झालेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंह...

तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये जखमी झालेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन

टीम लय भारी

तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये जखमी झालेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचंही निधन झालं आहे.  बंगळुरू येथील कमान रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते(Helicopter crash: Injured group captain Varun Singh dies)

अधिक  उपचारांसाठी त्यांना तामुळनाडूतील वेलिंग्टन रुग्णालयातून कमान रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आलं होतं. यानंतरही त्यांची प्रकृती गंभीरच होती.

ओबीसी आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ यांची पहिली प्रतीक्रीया

मनसेच्या डॅशिंग महिला नेत्या रूपाली पाटील शिवसेनेच्या वाटेवर?

CDS बिपीन रावत यांच्यासह 14 जणांचा मृत्यू  8 डिसेंबरला भारतीय वायुदलाचं  एमआय-17वी5 हे हेलिकॉप्टर जनरल बिपीन रावत यांच्यासह इतरही काही अधिकाऱ्यांना घेऊन रक्षा सेवा स्टाफ कॉटेज, वेलिंग्टन  येथे जात होतं. कुन्नूर येथे या हेलिकॉप्टरला अतिशय भीषण अपघात झाला यामध्ये अपघातानंतर लगेचच 13 जाणांचा मृत्यू झाला होता.

फक्त कॅप्टन वरुण सिंह हेच या अपघातातून बचावले होते. ते जवळपास ४५ टक्के भाजले होते. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. ज्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे सीडीएस बिपिन रावत व्याख्यानासाठी गेले होते, त्याच सुलूर हवाई तळावर वरुण सिंग विंग कमांडर होते.

पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथमध्ये आरती करताना कॅमेऱ्यात पाहताना दिसले; नेटकऱ्यांनी फोटो शेअर करत केलं ट्रोल

IAF helicopter crash: Group Captain Varun Singh succumbs to injuries in hospital

अखेर बुधवारी त्यांचीही प्राणज्योत मालवली. ज्यानंतर पुन्हा एकदा देश हळहळला. शौर्य चक्रनं कॅप्टन सिंह यांचा सन्मान ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांना यंदाच्याच वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शौर्य चक्रनं सन्मानित करण्यात आलं होतं.

ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याचं भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी १२ डिसेंबरला सागितलं होतं. “वरुणच्या तब्येतीत चढ-उतार होत आहेत, परंतु एक सैनिक असल्याने तो ही लढाई जिंकेल, असा मला विश्वास आहे,” असं भोपाळ येथे राहणारे त्यांचे निवृत्त वडील कर्नल केपी सिंग पीटीआयशी बोलताना सांगितलं होतं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी