29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeव्हिडीओअजितदादांनी विठ्ठलाला घातले साकडे

अजितदादांनी विठ्ठलाला घातले साकडे

टीम लय भारी

पंढरपूर : ‘कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे’, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाला घातले ( Ajit Pawar pray to lord Vithoda ).  

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यावेळी अजितदादा बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ. सारिका भरणे, मानाचे वारकरी कवडुजी भोयर, कुसुमबाई भोयर, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले,  पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, जगासमोर ‘कोरोना’चे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ कोरोना आटोक्यात आला, असे चित्र होते. परंतु कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे. याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

कोरोना गर्दीत चेंगरून मेला की काय असं मला वाटलं : अजित पवार

Ajit Pawar : कोरोनामुक्त अजित पवार मंत्रालयात अ‍ॅक्शन मोडमध्ये

चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित पवार आम्ही तुमचे बाप आहोत

राज्यातील शेतकरी यंदाच्या वर्षी अतिवृष्टीने संकटात आला आहे. या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुःख हलक करण्याची ताकद शासनाला दे, अशी मागणी विठ्ठलाकडे केली असल्याची सांगून पवार म्हणाले,  विठ्ठल कोरोनाचे संकट दूर करेलच, अशी समस्त भाविकांप्रमाणेच माझीही श्रद्धा आहे. पण सर्व काही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. आपणा सर्वांना कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्क वापरणे. गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे, आदी गोष्टी काटेकोरपणे अंमलात आणाव्या लागतील.

Ajit Pawar pray to lord Vithoda
मानाचे वारकरी कवडुजी नारायण भोयर आणि सौ. कुसुमबाई कवडुजी भोयर यांचा अजितदादांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करुन त्यांनी दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वंदन केले. या वीरांचा त्याग महाराष्ट्र नेहमी लक्षात ठेवेल. युवकांना देशासाठी लढण्याची प्रेरणा देईल असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले. संविधान दिनाच्या शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

पवार यांच्या हस्ते मानाचे वारकरी कवडुजी नारायण भोयर आणि सौ. कुसुमबाई कवडुजी भोयर ( मु. डौलापूर, पो. मोझरी, ता. हिंगणघाट, जि.वर्धा) यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा प्रवास सवलत पास सुपूर्द करण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या ‘दैनंदिनी 2021 ‘ चे प्रकाशन करण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी