22 C
Mumbai
Wednesday, January 25, 2023
घरव्हिडीओVIDEO : भारतातला पहिला केबल पूल विदर्भात पूर्ण होत आलाय

VIDEO : भारतातला पहिला केबल पूल विदर्भात पूर्ण होत आलाय

नागपूर-भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर गोसी खुर्द प्रकल्प परिसरात भारतातला पहिला केबल पूल विदर्भात पूर्ण होत आलाय. वैनगंगा नदीतीरी प्रसिध्द तीर्थक्षेत्र असलेल्या अंभोरा परिसरात हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृध्द ‘स्टेट ऑफ आर्ट’ पूल उभा राहातोय. पुढल्या वर्षी तो वाहतुकीला खुला होऊ शकतो.

नागपूर-भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर गोसी खुर्द प्रकल्प परिसरात भारतातला पहिला केबल पूल विदर्भात पूर्ण होत आलाय.
वैनगंगा नदीतीरी प्रसिध्द तीर्थक्षेत्र असलेल्या अंभोरा परिसरात हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृध्द ‘स्टेट ऑफ आर्ट’ पूल उभा राहातोय. पुढल्या वर्षी तो वाहतुकीला खुला होऊ शकतो.

कन्हान, वैनगंगा, आम, मुर्झा व कोलार या पाच नद्यांचा अंभोरा येथे संगम आहे. केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाहिलेले स्वप्न आता विदर्भातील मोठ्या सिंचन प्रकल्पांच्या बॅकवॉटरमध्ये पूर्ण होत आहे. मध्यवर्ती उंचीवर पारदर्शक व्ह्यूईंग गॅलरी हे या पुलाचे खास वैशिष्ट्य आहे. स्काय बाल्कनीच्या मजल्याचा काही भाग पारदर्शक काचेचा आहे. पर्यटकांसाठी तो एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव ठरेल.

या पुलामुळे नागपूर ते भंडारा गोंदिया दरम्यान वाहतूक जलद होईल. सध्या अंभोरा ते भंडारा हे अंतर पार करण्यासाठी दीड तास वेळ लागतो. हा पूल सुरू झाल्यानंतर ते अंतर अवघ्या आठ ते दहा मिनिटात पार करणे शक्य होणार आहे. 705.20 मीटर लांबीच्या या पुलासाठी सुमारे 127.54 कोटी रुपये खर्च होत आहेत. पुलाची रुंदी 15.26 मीटर आहे. वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग यासोबतच परिसरातील पर्यटकांसाठी एक विशेष पर्यटनस्थळ म्हणूनही या पुलाचा विकास करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

काम हीच आपली ओळख म्हणजे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी : आमदार रोहित पवार

नितीन गडकरींनी आपल्याच सरकारविरोधात दाखविला अविश्वास

नितीन गडकरी खूपच चांगला माणूस, पण; अशोक चव्हाणांची खंत

या पुलाच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजूंचे फुटपाथ पॅनोरॅमिक लिफ्ट आणि जिने यांच्यासह उभारण्यात येत असून ते 3 मीटर रुंद केले आहेत. सेंट्रल गॅलरी आणि पायलॉन गॅलरीसह हे गॅलरी ब्रिज आरटीएलच्या तुलनेत 40 मीटरहून अधिक असून चैतन्येश्वर मंदिर परिसरासह आसपासच्या क्षेत्रातील उत्कृष्ट दृष्ये या पुलावरून पर्यटकांना पाहता येणार आहेत. तसेच डाऊनस्ट्रीममध्ये दूर असलेल्या नदीच्या दृश्यासह संपूर्ण बॅकवॉटर जलाशय परिसर आणि टेकड्यांच्या दृष्यांचाही आनंद घेता येणार आहे.

Indias First Cable Stayed Bridge, Ambhora Bridge, Nagpur Bhandara Time

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!