30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमुंबईमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात नवे खासगी सचिव

मंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात नवे खासगी सचिव

टीम लय भारी

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात नव्या खासगी सचिवांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा मंत्रालयात गेल्या अनेक दिवसांपासून रंगली होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. बालाजी खतगावकर यांची नवे खासगी सचिव म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. अगोदरचे खासगी सचिव दिलीप ढोले यांची पदावनती करून त्यांना विशेष कार्य अधिकारी पदावर नेमले आहे.

‘लय भारी’ने दोन आठवड्यांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिव पदाच्या संभाव्य बदलाबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती.

नगर विकास हे अत्यंत महत्वाचे खाते आहे. परंतु या खात्याविषयी उत्तम ज्ञान असलेले अधिकारी एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात नव्हते. त्यामुळे नगरविकास विभागाचे मंत्रीपद हाती येऊनही गेल्या तीन महिन्यांत शिंदे यांच्या कार्यालयाला प्रभावी काम करता आले नव्हते. स्वतः शिंदे हे सुद्धा आपल्या कार्यालयाच्या कामाविषयी समाधानी नव्हते. शिवाय सामान्य लोकांना सन्मानाची वागणूक देईल अशा खासगी सचिवाची आवश्यकता शिंदे यांच्या कार्यालयाला हवी होती. स्वतः शिंदे सामान्य लोकांशी नम्रपणे वागतात. कुणालाही ते तुच्छ लेखत नाहीत. त्यामुळे खासगी सचिव सुद्धा अशाच स्वभावाचे असायला हवेत, अशी भावना लोकांकडून व्यक्त करण्यात येत होती. परिणामी खासगी सचिव या पदावर बालाजी खतगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बालाजी खतगावकर यापूर्वी मीरा – भाईंदर महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. महापालिकेत काम केले असल्यामुळे नगरविकास विभागाविषयी त्यांना इत्यंभूत ज्ञान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे यांचे कार्यालय आता उत्तम कामगिरी करू शकेल असा आशावाद सामान्य लोकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयात बिनकामाचे अधिकारी, नगरविकास विभाग मंत्री कार्यालयावर नाराज

वाढदिवसानिमित्त मंत्री एकनाथ शिंदे यांचे अनोखे समाजकार्य; हृदयाला छिद्र असलेल्या १०० मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करणार

भाजपला चीतपट करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ची आणखी एका निवडणुकीत एकजूठ

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी