31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनेमका कधी जाहीर होणार CBSE बोर्डाचा निकाल ?

नेमका कधी जाहीर होणार CBSE बोर्डाचा निकाल ?

टीम लय भारी

मुंबई : यंदाच्या वर्षी राज्य महामंडळाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला असला तरी, CBSE बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जुलै महिना अर्ध्यावर आला असला तरी जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून हा निकाल कधी जाहीर करण्यात येणार ? असा प्रश्न आता पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

दरवर्षी महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या आधी CBSE बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात येतो. पण यंदा १४ जुलै उजाडली तरी हा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. पण CBSE बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल आज (दि. १४ जुलै २०२२) किंवा उद्या दि. १५ जुलै २०२२ ला जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात अली आहे.

CBSE बोर्डाचा निकाल जाहीर होण्यास उशीर होत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया देखील सुरु करण्यात आलेल्या नाही. काही टक्के विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाच्या लाखो विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश थांबविण्यात काय अर्थ ? असा प्रश्न पालकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार CBSE बोर्डाच्या दहावीचा टर्म २ चा निकाल जाहीर होऊ शकतो. यानंतरच काही दिवसात बारावीचा निकाल देखील जाहीर करण्यात येईल. पण CBSE बोर्डाच्या आधीच्या निकालांना पाहता, निकाल जाहीर करण्याच्या दोन ते तीन तास आधी याबाबतची माहिती CBSE बोर्डाकडून देण्यात येईल.

http://cbse.gov.in आणि http://cbresults.nic.in या CBSE च्या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर करण्यात येईल. निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थी आपली गुणपत्रिका डाउनलोड देखील करू शकतात.

हे सुद्धा वाचा :

दहावीत उत्तीर्ण होऊनही विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

महाराष्ट्र सरकारची आणखी एक मोठी घोषणा

भारतात आढळला दुर्मिळ रक्तगट; जगात केवळ 9 जणांशीच होतो मॅच

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी