30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रसंजय मंडलिकांच्या निर्णयावर सतेज पाटलांनी व्यक्त केली नाराजी

संजय मंडलिकांच्या निर्णयावर सतेज पाटलांनी व्यक्त केली नाराजी

टीम लय भारी

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदारांच्या पाठोपाठ आता खासदारांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १२ खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये कोल्हापूरच्या संजय मंडलिक (Sanjay Mandalik) आणि धैर्यशील माने यांचा समावेश आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे संजय मंडलिक यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे फक्त त्यांच्याच पक्षातील नेते नाही तर इतर पक्षातील नेत्यांनी देखल नाराजी दर्शविली आहे.

संजय मंडलिक यांच्या बंडखोरीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यावर पहिल्यांदाच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. संजय मंडलिक यांच्या या निर्णयामुळे दुःख झाल्याचे आमदार सतेज पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. संजय मंडलिक हे दिल्लीला जात असताना त्यांना तुम्ही दिल्लीला जाऊ नका असे आमच्याकडून फक्त सांगण्यातच आले नव्हते तर विनंती सुद्धा करण्यात आली होती. पण त्यांनी तसे न करता दिल्लीची वाट धरली. त्यांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच दुःखद आहे. पण जिल्ह्याच्या राजकरणामध्ये, विकासामध्ये संजय मंडलिक सोबत राहतील, अशी भावना सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार यांचा वेगळा गट तयार करून काय मिळणार आहे? या राजकीय घटनेमागील खरी कारणं येत्या दोन महिन्यात बाहेर तर येतीलच. पण देशामध्ये याआधी कधीही असे सुडाचे राजकारण झाले नव्हते असेही यावेळी सतेज पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच विरोधी पक्षांना अडचणीत आणण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात अद्यापही भाजप-शिंदे सरकारकडून मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. किमान सरकारने राज्यात मदत आणि पुनर्वसन मंत्री तरी नेमायला हवा, असेही सतेज पाटलांकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :

काय हाटील, काय झाडी म्हणत मजा मारुन राहिले… यांना मजा मारायला निवडून दिले का? जळगावात तुफान डायलाॅगबाजी

निष्ठा यात्रेनंतर शिवसेनेला भिवंडीत बसला धक्का

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला नेते एकनाथ खडसे यांच्या हटके शुभेच्छा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी