32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्र'तो पुन्हा येईल'

‘तो पुन्हा येईल’

टीम लय भारी

मुंबईः राज्यात काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी येत्या चार दिवसात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवडयात राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. उद्यापासून राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील चार दिवस मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

राज्यात मुंबईसह कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवारी आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुमारे 15 दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजजीवन विस्कळीत झाले आहे.

अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हळूहळू पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 16 बंधाऱ्यांवर पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हे सुध्दा वाचा:

VIDEO : प्लास्टिकचा वापर आरोग्यास घातक

काॅंग्रसचे नेते निघाले ‘अतिवृष्टी’ दौऱ्यावर

चक्क ‘वाघोबां’साठी वाहतूक थांबवली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी