29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड

वयाच्या 77 व्या वर्षी उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास .

आपल्या अभिनय आणि दमदार आवाजाने भल्याभल्यांना चक्कीत करणारे प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवार(26 नोव्हेंबर) रोजी वयाच्या 77 व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झाले आहे. विक्रम गोखले गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते, गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र आज दुपारी 1.37 वाजता त्यांनी वयाचा अखेरचा श्वास घेतला.

‘मल्टीपल ऑर्गन फेलियर’ झाल्याची होती तक्रार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्रम गोखले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे त्यांची प्रकृती सतत खालावत होती, त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गोखलेंना ‘मल्टीपल ऑर्गन फेलियर’ झाल्याची तक्रार होती.

चित्रपट सृष्टीतील एक गाजलेलं नाव होतं विक्रम गोखले
विक्रम गोखले यांनी हम दिल दे चुके सनम, हे राम, तुम बिन, हिचकी आणि मिशन मंगल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या दमदार अभिनयासाठी प्रशंसा मिळवली. 17 जून 2022 रोजी प्रदर्शित झालेला ‘निकम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना 2010 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ही मिळाला होता. हा पुरस्कार त्यांना ‘अनुमती’ या त्यांच्या मराठी चित्रपटासाठी देण्यात आला. एक चांगले आणि नावाजलेले अभिनेते असण्यासोबतच विक्रम गोखले पुण्यात अभिनयाची शाळाही चालवत होते.

आजी आणि वडील ही होते नामवंत कलाकार
विक्रम गोखले हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्नीसह पुण्यातचं राहत होते. दिवंगत विक्रम गोखले यांचा संबंध हा अभिनय कुटुंबातुन येतो. त्यांची आजी आणि वडील हे मराठी चित्रपट आणि रंगमंचावरील सुप्रसिद्ध अभिनेते होते. गोखलेंचे वडील चंद्रकांत गोखले यांनीही पन्नासहून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. विक्रम गोखले यांच्याबद्दल असे ही म्हंटले जाते की त्यांचा दमदार आवाज आणि त्यांचे मोठे डोळे कोणत्याही व्यक्तिरेखेत प्राण फुंकत असत.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : कामाख्या देवीला रेड्याचे बळी देतात का ?, एकनाथ शिंदे काय म्हणाले ऐका!

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे म्हणाले, सरकार पडेल आणि मंत्रीमंडळ विस्तार होईल

अभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंका

काही दिवसांपूर्वी मृत्यूची अफवा उठली होती
काही दिवसांपूर्वीच विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरली होती. त्यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्सनी यावर शोक व्यक्त करण्यास ही सुरुवात केली होती, या अफवेवर प्रतिक्रीया देत विक्रम गोखलेच्या कुटुंबीयांनी गोखले जिवंत असल्याचे सर्वांना स्पष्ट केले. गोखलेच्या पत्नी वृषाली यांनी तर त्यांच्या निधनाची बातमी फेटाळून लावली होती.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी