30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्र वैचारिक दडपशाही खपवून घेणार नाही, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याची स्टार...

महाराष्ट्र वैचारिक दडपशाही खपवून घेणार नाही, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याची स्टार प्रवाहला तंबी

टीम लय भारी

मुंबई : ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील कलाकार किरण माने यांच्या मालिकेतून झालेल्या हकालपट्टीवरून बराच गदारोळ माजला आहे. याविरोधात तसेच सकारात्मक अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय याप्रकरणी राजकीय रंगही देण्यात आला होता.(Balasaheb Thorat, Maharashtra  tolerate ideological repression)

मानेंविरोधात झालेल्या या कारवाईविरोधात राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टिवटरच्या माध्यमातून स्टार प्रवाह वाहिनीला चांगलेच झोडपले आहे. आणि ही कारवाई करणाऱ्या स्टार प्रवाहला आपली चूक सुधारा असा तंबीवजा आदेशही दिला आहे.

हे सुद्धा वाचा

सहकाराचे एक आदर्श मॉडेल राज्याला देणारे भाऊसाहेब थोरात

बाळासाहेब थोरातांच्या दुरदृष्टीतून साकारला ई- पीक पाणी प्रकल्प, राजस्थान सरकारनेही घेतला आदर्श

बाळासाहेब थोरात ‘कोरोना’तून बरे झाले, जनतेसाठी केल्या महत्वाच्या सुचना

Maharashtra minister Balasaheb Thorat tests positive of Covid-19

 किरण मानेंविरोधातील कारवाईविरोधात महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टिवटर म्हटले आहे की,  ‘किरण माने या कलाकाराने राजकीय मत व्यक्त केले म्हणून त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी असून त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकारावर घाला घालण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्र ही वैचारिक दडपशाही खपवून घेणार नाही. स्टार प्रवाह वाहिनीने आपली चूक सुधारावी.’

 ‘काट लो जुबान, आंसुओ से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा’ या किरण माने यांनी केलेल्या   फेसबुक पोस्टवरून बराच गदारोळ माजला होता. याविरोधात तसेच सकारात्मक अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याला राजकीय रंगही देण्यात आला होता. याची किंमत म्हणून माने यांना त्याच्या मुलगी झाली हो या मालिकेतून डच्चू देण्यात आला. स्टार प्रवाह या वाहिनीने केलेल्या कारवाईवर अनेकांनी हा सरळसरळ अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला असल्याचे म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी