35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeव्यापार-पैसा5G Spectrum Auction: जाणून घ्या कोणत्या शहरांमध्ये 5G सेवांना होणार सर्वप्रथम ...

5G Spectrum Auction: जाणून घ्या कोणत्या शहरांमध्ये 5G सेवांना होणार सर्वप्रथम सुरूवात

आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला हाय स्पीड मध्ये इंटरनेट सेवांचा लाभ घेणाची सवय झाली आहे. आधी सरकारने 3G इंटरनेट सेवा सामान्य जनतेला सेवा उपलब्‍ध करू दिली. त्यांनतर 4G इंटरनेट सेवेला अंत्यत कमी वेळेत तूफान प्रतिसाद दिला. आता 5G सेवा कधी बाजारात येणार हयाची ग्राहकांना उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु त्यासाठी त्यांना थोडा वेळ वाट बघावी लागणार आहे.

आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला हाय स्पीड मध्ये इंटरनेट सेवांचा लाभ घेणाची सवय झाली आहे. आधी सरकारने 3G इंटरनेट सेवा सामान्य जनतेला सेवा उपलब्‍ध करू दिली. त्यांनतर 4G इंटरनेट सेवेला अंत्यत कमी वेळेत तूफान प्रतिसाद दिला. आता 5G सेवा कधी बाजारात येणार हयाची ग्राहकांना उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु त्यासाठी त्यांना थोडा वेळ वाट बघावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय इलेक्ट्रोनिक व टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशात काही शहरांमध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत सेवा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. त्यांनी असेही नमूद केले की देशातून प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरू झाल्यानंतर संपूर्ण देशात जलद गतीने या सेवांचा विस्तार करण्यात येईल.

इलेक्ट्रोनिक व टेलिकॉम मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, नुकत्याच पार पडलेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावातून सरकारला १७८७६ करोड रूपयांची मिळकत झाली. या लिलावामध्ये भारती-एयरटेल, रिलायन्स-जिओ, अदानी डेटा नेटवर्क आणि आयडिया-वोडाफोन या कंपन्यानी बोली लावली होती.

5G इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर इंटरनेटचा साधारण स्पीड १०० एमबीपीस असेल. सध्या सुरू असलेल्या 4G इंटरनेट सेवेचा साधारण स्पीड ६०-७० एमबीपीस एवढा आहे.

कोणत्या तेरा शहरांमध्ये सर्वप्रथम 5G सेवा उपलब्ध होतील – मुंबई, अहमदाबाद, बेंगलूरू, चंडिगड, गांधीनगर, गुरूग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चैन्नई, लखनऊ, पुणे आणि दिल्ली.

हे सुद्धा वाचा –

Asia Cup 2022: खेळात चुक होणे ही स्वाभाविक गोष्ट; विराट कोहलीने केली अर्शदीप सिंहची पाठराखण

Hemant Soren : ‘अखेर’ हेमंत सोरेन विश्वास दर्शक ठराव जिकंले

Amit Shah : अमित शाहांनी देवेंद्र फडणविसांना दाखविली ‘जागा’ !

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात 5G इंटरनेट सेवा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेचा उल्लेख केला होता. भारतात लवकरात लवकर 5G इंटरनेट सेवा उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे. तसे झाल्यास सध्याच्या इंटरनेट स्पीडच्या तुलनेत 5G चा स्पीड १० पट अधिक वेगवान असेल. भारतात होणाऱ्या इंटरनेट क्रांतीमुळे देशातील प्रत्येक खेडयात इंटरनेट सेवा पोहोचण्यास मदत होईल असे त्यांनी नमूद केले.

आमचे युटयूब चॅनेल सुद्धा सबस्क्राइब करा –

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी