33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeव्यापार-पैसादेशातील साडेअकरा कोटी PAN निष्क्रिय; यात तुम्ही आहात का?

देशातील साडेअकरा कोटी PAN निष्क्रिय; यात तुम्ही आहात का?

ही बातमी तुमच्या-आमच्या सर्वांच्या कामाची आहे. तुम्ही तर तुमचं परमनंट अकाऊंट नंबर (PAN) आधारशी लिंक केले नसेल तर ते नक्कीच निष्क्रिय (deactivated) झाले असेल. सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) दिलेल्या माहितीनुसार यंदा तब्बल साडेअकरा कोटी पॅन (PAN) निष्क्रिय करण्यात आले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पॅनधारकांनी (PANHOLDER) ते त्यांच्या आधारशी लिंक केले नव्हते. त्यासाठी केंद्र सरकारने मुदत दिली होती. प्राप्तीकर परताव्यासाठी (income tax return) पॅन हे महत्त्वाचे आहे. काही वर्षांपासून पॅन आणि आधार नंबर एकमेकांशी जोडले (लिंक) पाहिजेत, असे सरकारकडून अनेकदा सांगण्यात आले होते.

मध्य प्रदेशमधील माहिती अधिकारी कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडे किती पॅन निष्क्रिय केले, याची माहिती विचारली होती. ज्यांनी त्यांचे पॅन नंबर आधारशी लिंक केले नव्हते त्यांना सरकारने ३० जून २०२३ पर्यंत मुदत दिली होती. त्यासाठी सरकारने जाहिराती प्रसिद्ध केल्या, समाज माध्यमांमधूनही लोकांना माहिती दिली. तरीही आणखी मुदतवाढ मिळेल या आशेने लोक टंगळमंगळ करत राहिले. अशा लोकांना ही ढिलाई भोवली. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने तब्बल साडेअकरा कोटी लोकांचे पॅन निष्क्रिय करून त्यांना मोठा दणका दिला आहे.

प्राप्तीकर परताव्यासाठी पॅन खूप महत्त्वाचे आहे. ज्यांनी १ जुलै २०१७ नंतर पॅन काढले आहेत त्यांचे पॅन आपोआप आधारशी लिंक झाले आहेत. पण १ जुलै २०१७ पूर्वी पॅन काढलेल्या ग्राहकांना ते स्वत:हून आधार नंबरशी लिंक करण्याची गरज असते. आजमितीला देशात एकूण ७० कोटी २४ लाख पॅनधारक आहेत. त्यातील ५७ कोटी २५ लाख पॅन कार्ड ३० जून २०२३ पर्यंत आधारशी लिंक करण्यात आले होते.

तुमच्या पॅनचे स्टेटस कसे तपासाल?

देशातील एकूण साडेअकरा कोटी पॅन निष्क्रिय करण्यात आले असून त्यात तुमचाही पॅन असू शकतो. हे तपासायचे असेल तर खालीलप्रमाणे करा

  • प्रथम इन्कम टॅक्सच्या साईटवर जा – www.incometax.gov.in/iec/foportal
  • डाव्या बाजूला –  Link Aadhaar Status वर क्लिक करा
  • यात १० अंकांचा PAN आणि १२ अंकी Aadhaar number लिहा
  • त्यानंतर View Link Aadhaar Status पाहा

हे ही वाचा

सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील आहात; सावधान…आधी ही बातमी वाचा !

आम्हीही जावेद अख्तर आणि सलीम खान यांना बोलवू पण, कार्यक्रम दिवाळीचा नसेल

मनसेला यश, अमित ठाकरे ‘हे’ गाव घेणार दत्तक

आता समजा तुमचे पॅन निष्क्रिय झाले असेल आणि ते तुम्हाला पुन्हा अॅक्टिव्हेट करायचे असेल तर त्यासाठी एक हजार रुपये भरावे लागतील. प्रथम त्यासाठी तुमच्या प्राप्तीकर कार्यालयातील अॅसेसमेंट अधिकाऱ्याला पत्र लिहावे लागेल. त्यासाठी नुकसानभरपाई (इन्डेमिनिटी बाँड) द्यावी लागते. आता या सर्वांनी त्यांचे पॅन पुन्हा अॅक्टिव्हेट करायचे ठरवले तर तर सर्वांचे मिळून केंद्राच्या तिजोरीत तब्बल ११ हजार ५०० कोटी रुपये जमा होतील.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी