32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
HomeमुंबईCorona vaccine : 'कोरोना' लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन गरजेचं, जाणून घ्या प्रक्रिया

Corona vaccine : ‘कोरोना’ लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन गरजेचं, जाणून घ्या प्रक्रिया

टिम लय भारी

मुंबई : तुम्हाला कोरोनाची बाधा होऊन गेली असेल तरीही लसीकरण (Corona vaccine) करण्याची गरज असल्याचा सल्ला, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. यामुळे कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांत प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास मदत होईल. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारांसोबत मिळून केंद्र सरकारने कोरोना लसीकरण्याच्या पहिल्या टप्प्याची तयारी सुरु केली आहे.

कोरोना प्रतिबंध लस मिळवण्यासाठी तुम्हाला फोटो आयडी पुराव्यासह ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. ऑन द स्पॉट कोणतीही नोंदणी होणार नाही. सरकार यासाठी एक वेबसाइट सुरू करणार आहे. नोंदणीनंतर, आपल्याला लसीचे दोन्ही डोस केव्हा आणि कुठे दिले जातील हे सांगण्यासाठी SMS पाठविला जाईल. दोन्ही डोसनंतर, क्यूआर आधारित प्रमाणपत्र देखील उपलब्ध असेल. नोंदणी कशी होईल, त्यासाठी कोणती कागदपत्रे वैध आहेत, संपूर्ण प्रक्रिया काय आहे याबद्दल जाणून घेऊया

सरकारने सांगितल्यानुसार, आरोग्य सेवा आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांना प्रारंभिक टप्प्यात लस देण्यात येणार आहे. पुरेशी डोस उपलब्ध असल्यास, ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही पहिल्या टप्प्यात लस दिली जाईल. नोंदणी ऑनलाइन होईल आणि ती अनिवार्य करण्यामागील हेतू असा आहे की, लसीकरण मोहिमेचा सहज आढावा घेतला जाऊ शकतो. एक विशेष अॅप विकसित केला गेला आहे, ज्यात सर्व डेटा फीड केला जाईल. आपल्याला प्रथम डोस मिळाला की दुसरा, हे देखील सूचित करेल. दोन डोसचे शेड्यूल पूर्ण केल्यावर SMS अलर्ट येईल.

नोंदणी ऑनलाईन होईल. सरकार यासाठी वेब पोर्टल आणि अ‍ॅप लाँच करू शकते. नोंदणीमध्ये एक फॉर्म असेल ज्यामध्ये नाव, पत्ता, वय, वैद्यकीय माहिती विचारली जाऊ शकते, सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला एक फोटो आयडी निवडावा लागेल जो पडताळणीसाठी वापरला जाईल. जेव्हा आपण लसीकरण केंद्राकडे जाता तेव्हा डोस देण्यापूर्वी हा आयडी जुळविला जाईल. फॉर्म सबमिट केल्यास आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर SMS पाठविला जाईल. मग आपल्याला लसीकरण वेळापत्रकातील SMS ची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सरकार लसीची उपलब्धता आणि प्राधान्य यादीत आपले स्थान यावर आधारित लसीकरण वेळापत्रक तयार करेल. लस कोठे व केव्हा लागू होईल हे सांगण्यासाठी तुमच्या मोबाईलवर SMS पाठविला जाईल. ठरलेल्या वेळी लसीकरण केंद्राकडे जाण्यासाठी आपल्या क्रमांकाची प्रतीक्षा करावी लागेल. नोंदणीच्या वेळी दिलेला तुमचा फोटो आयडी पुरावा घेणे विसरू नका, कारण आयडी पडताळणीशिवाय लस दिली जाणार नाही. सरकारच्या मतानुसार, ही लस योग्य व्यक्तीला दिली जावी यासाठी फोटो आयडी अनिवार्य करण्यात आले आहे.

SMS मध्ये आपल्याला लसीकरण केंद्राची माहिती आणि वेळ सांगितली जाईल. जेव्हा आपण केंद्रावर पोहोचता तेव्हा आपल्याला प्रतीक्षा कक्षात आपल्या नंबरची प्रतीक्षा करावी लागेल. नंबर आला की आपल्याला फोटो आयडी दर्शविणे आवश्यक असेल. कागदपत्र पडताळल्यानंतर आपल्याला लसीकरण कक्षात पाठविले जाईल. आपणास एक प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिक लस टोचतील, आणि ते निरीक्षण कक्षात पाठवतील. लसीकरणानंतर किमान अर्धा तास केंद्रात रहावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या वाटत असल्यास तेथे उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. अर्ध्या तासानंतर आपण घरी जाऊ शकता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी