31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeक्राईमदर्शन सोळकी आत्महत्या प्रकरण आयआयटी विद्यार्थी खत्री यांच्या जामिनावर उद्या निकाल

दर्शन सोळकी आत्महत्या प्रकरण आयआयटी विद्यार्थी खत्री यांच्या जामिनावर उद्या निकाल

पवई आयआयटीतील विद्यार्थी दर्शन सोळंकी याने आत्महत्या केली आहे.जातीयवाद झाल्याने त्याने आत्महत्या केली आहे.या प्रकरणातील आरोपी अरमान खत्री याने जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याच्या जामीन अर्जावर 2 मे रोजी सुनावणी पूर्ण झाली.आता त्यावर उद्या निकाल देण्यात येणार.मुंबई सेशन कोर्टातील विशेष एससी,एसटी कोर्ट निकाल देणार आहे.

पवई आयआयटी येथील प्रथमवर्षं केमिकल इंजिनियरिंगचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याने फेब्रुवारी महिन्यात आत्महत्या केली आहे.तो राहत असलेल्या हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून त्याने आत्महत्या केली आहे.दर्शन हा मागासवर्गीय होता.मागासवर्गीयाच्या कोट्यातून त्याला आयआयटी मध्ये प्रवेश मिळाला होता.मात्र, तिथे त्याचा जाती वरून छळ केला जात होता. याला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिट्ठी लिहून ठेवली होती.या चिट्टीत अरमान खत्री याच नाव लिहल होत.अरमान त्याला जातीवरून जास्त त्रास देत होता.यामुळे अरमान याला पवई पोलिसांनी 9 एप्रिल 13 रोजी अटक केली आहे.सध्या तो जेल मध्ये आहे.तो न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याने आता जामिनासाठी अर्ज केला आहे.अरमान खत्रीच्या जामिनाला सरकारी पक्षाने तीव्र विरोध केला आहे.

विशेष न्यायाधीश ए. पी. कानडे यांच्या कोर्टात सुनावणी झाली.सरकारी पक्षाने आज दीर्घ युक्तिवाद करीत आक्षेप घेतला आहे.याआधी आरोपीच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळत जामिनासाठी युक्तिवाद केला होता.मात्र, आता बचाव पक्ष त्यावरही आक्षेप घेत पुन्हा बाजू मांडली.2 मे रोजी सर्व सुनावणी संपली.त्यानंतर आता उद्या कोर्ट आपला निकाल देणार आहे.

काय आहे दर्शन सोलंकी प्रकरण

दर्शन सोलंकी हा मागासवर्गीय विद्याथी आहे.केंद्रीय मेरिट लिस्ट मधून त्याला पवई आय आय टी मध्ये मागासवर्गीय कोट्यातून प्रवेश मिळाला होता.तो होस्टेल मध्ये राहत होता. यावेळी त्याच्या सोबत होस्टेलला राहणारे वरीष्ठ जातीचे विद्यार्थी दर्शन सोलंकी सोबत जातीवादी पणा करत होते. त्याला सतत त्रास देत होते.त्याला प्रचंड मानसिक त्रास होत होता.यातून त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं.सुरुवातीला दर्शनबाबत योग्य तपास व्हावा, त्याला न्याय मिळावा यासाठी अनेक आंदोलन झालीत.

हे सुद्धा वाचा

सीबीआयने जीएसटी अधिक्षकावर 25 लाख लाच मागितल्याचा केला गुन्हा दाखल

वेशव्यावसायातून दोन परदेशी महिलांची सुटका

पार्किंगची कटकट संपली; आता घर बसल्या बुक करता येणार पार्किंग स्लॉट

या घटनेचा तपासाठी एस आय टी बनवण्यात आली.त्या नंतर कारवाईला सुरुवात झाली. एस आय टी च्या अधिकाऱ्यांनी प्रथम दर्शन याने आत्महत्ये पूर्वी लिहलेली चिट्ठी शोधून काढली. त्यानुसार अरमान खत्री याला अटक केली. एक आठवड्या नंतर तपास एस आय टी कडे सोपवण्यात आला त्या आधी पवई पोलीस स्टेशनचे अधिकारी तपास करत होते. त्यांना दर्शन ची चिट्टी सापडली नाही,याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. पवई पोलिसांनी हा प्रकार जाणून बुजून तरी केला नाही ना, याबाबत ही तपास सुरू आल्याचं विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितलं.

Darshan Solaki suicide case
IIT student Khatri’s bail verdict tomorrow

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी