30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयगोपीचंद पडळकरांचे ट्विट; नाव न घेता शरद पवारांवर साधला निशाना

गोपीचंद पडळकरांचे ट्विट; नाव न घेता शरद पवारांवर साधला निशाना

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले राजकीय आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनाच्या दिवशी (दि.२ मे) पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. पवारांनी राजीनामा देऊ नये म्हणून आंदोलने केली. शनिवारी पक्षाच्या समितीने त्यांचा राजीनामा मंजूर केला. या सगळ्या घडामोडी घडत असताना भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार य़ांचे नाव घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी आणि विशेषत: पवार यांच्याविरोधात नेहमीच आक्रमक असल्याचे दिसते. शरद पवार, अजित पवार, रोहित पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर नेहमीच टीका, आरोप करत असतात. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर बारामतीमधून रिंगणात उतरले होते. मात्र त्यावेळी त्यांचा मोठा पराभव झाला होता. गोपीचंद पडळकर यांनी पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर आज अशीच बोचरी टीका केली आहे. पडळकर यांनी यासंदर्भात ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की, ”स्वप्न पंतप्रधान बनण्याचे पण धडपड मात्र आपल्याच पक्षात आपलं महत्व चाचपडण्याची… धन्य हा महाराष्ट्राचा महानटसम्राट!”


हे सुद्धा वाचा

दर्शन सोळकी आत्महत्या प्रकरण आयआयटी विद्यार्थी खत्री यांच्या जामिनावर उद्या निकाल

सीबीआयने जीएसटी अधिक्षकावर 25 लाख लाच मागितल्याचा केला गुन्हा दाखल

पार्किंगची कटकट संपली; आता घर बसल्या बुक करता येणार पार्किंग स्लॉट

शरद पवार यांनी 2 मे रोजी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक शक्यता वर्तविण्यात येत होत्या. अजित पवार आणि काही आमदार भाजपसोबत जाण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा देखील होती. तसेच पक्षातील आमदारांचा मोठा गट अजित पवार यांच्या समर्थनात असल्याचे देखील बोलले जात होते. अशा सर्व चर्चा सुरु असताना शरद पवार यांनी राजीनामा देऊन पक्षावर आपली पकड मजबूत करत आहेत असे देखील बोलले जात आहे. अशा परिस्थितीत गोपीचंद पडळकर यांनी पवार यांचे नाव न घेता, स्वप्न पंतप्रधान बनण्याचे मात्र त्यांची आपल्याच पक्षातील महत्त्व चाचपडण्याची धडपड त्यांना करावी लागत आहे, अशी बोचरी टीका केली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी