29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमनोरंजनबॅलो फिल्म्स' आयोजित अभिनय प्रशिक्षण शिबिर

बॅलो फिल्म्स’ आयोजित अभिनय प्रशिक्षण शिबिर

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई:  सिनेमा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर केवळ ग्लॅमरस दुनिया येते. पण ही सिनेमाची एक बाजू झाली. अनेकांनी सिनेमाच्या पडद्याचा सामाजिक प्रश्नाच्या मांडणीचं व्यासपीठ म्हणूनही वापरकेलेला आपल्या निदर्शनास येईल.(Bellow Films’ Acting Training Camp)

आज सोशल मीडियाच्या प्रसारामुळे सिनेमा किंवा डिजिटल युग सर्वसामान्यांच्या हातात आलं आहे.काही तरुण आपल्याला जे आणि जसं सुचेल तसा डिजिटल साधनांचा वापर करतांना दिसतात.

पण सिनेमा म्हणजे केवळ मोबाईलवर शूट केलेले व्हिडिओ नव्हे. सिनेमा हा अनेक कलांचा संगम असतो. सिनेमा निर्मितीचं एक शास्त्र असतं. याची ओळख सुरुवातीच्या काळात झाली तर चांगली निर्मिती होऊ शकते.

योग्य वेळी, योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधी मिळाली तर अनेक कलाकार घडू शकतात याची अनेक उदाहरणं आपल्याला आजूबाजूला दिसतात.

हे सुद्धा वाचा

मिस्टर मम्मी या चित्रपटामध्ये दिसणार रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख

नागराज मंजुळेचा ‘झुंड’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच दिसणार एकत्र, लव रंजनच्या चित्रपटांत करणार काम

Ali & Ava: Mature romance with emotional punch

सिनेमाच्या क्षेत्रात धडपडणाऱ्या आजच्या तरुणांना आणि सिनेमाची आवड असणाऱ्या सर्व स्तरातल्या माणसांना अभिनयाचं तंत्र कळावं यासाठी कॅबॅलो फिल्म्सने अभिनय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. महाराष्ट्र वैदु विकास समितीया दुर्गा गुडूलू यांच्या संस्थेच्या काही होतकरु आणि गरीब मुलांना या शिबिरात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

शिबिरामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता वाडये मार्गदर्शन करतील. रेड हिस्ट्रीआणि पांढन्याया राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेत्या लघुपटांचे लेखक आणि दिग्दर्शक संदीप माने यांनी हे शिबिर आयोजीत केले आहे. सगळे मार्गदर्शक नाटक याविषयातील पदव्युत्तर आहेत. हे शिबिर ६ मार्च २०२२ पासून अंधेरी येथे सुरू होत असून, फकर विवारीच होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी