38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजनकोलकत्ता नाईट रायडर्सच्या वेगवान गोलंदाजाचा भारतीय संघात समावेश

कोलकत्ता नाईट रायडर्सच्या वेगवान गोलंदाजाचा भारतीय संघात समावेश

टीम लय भारी

ओव्हल : भारत विरुद्ध इंग्लंड मध्ये चौथ्या कसोटी सामन्याला गुरुवार पासून सुरुवात होत आहे. या सामन्यामध्ये कोलकत्ता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात समाविष्ट केले आहे. या बाबतची माहिती बीसीसीआयने आपल्या ट्विटर हॅंडलवरून दिली आहे. चौथा कसोटी सामना हा इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. (Prasidh Krishna included in India’s Test squad).

कृष्णाने मार्चमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्ध तीन एक दिवसीय सामने खेळत पदार्पण केले होते. या एक दिवसीय सामन्यात त्याने ६ विकेट्स घेतले होते. त्याचबरोबर टी- २० करियरमध्ये त्याने ४७ सामन्यात ४१ विकेट्स घेतले होते.

लेकीचे गुण वाढविल्याने मुख्यमंत्रीपद गमवावे लागलेल्या नेत्याची कहाणी

पुणे पोलिसांकडून महिला पोलिसांसाठी खुशखबर

Prasidh Krishna included in India's Test squad
वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा

तिसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच पहिला कसोटी सामना हा रद्द करण्यात आला. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत, गुण मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे (The score is tied at 1-1 in the series).

दोन लाचखोर वनाधिकाऱ्यांच्या हातात बेड्या

England vs India: Fast Bowler Prasidh Krishna Added To India’s Squad For Fourth Test

भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन या कसोटी मालिकेत अद्याप दिसलेला नाही. तसेच अष्टपैलू गोलंदाज रवींद्र जडेजा आतापर्यंत झालेल्या तीनही कसोटींमध्ये एकमेव फिरकीपटू म्हणून खेळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी