37 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयलेकीचे गुण वाढविल्याने मुख्यमंत्रीपद गमवावे लागलेल्या नेत्याची कहाणी

लेकीचे गुण वाढविल्याने मुख्यमंत्रीपद गमवावे लागलेल्या नेत्याची कहाणी

प्राची ओले : टीम लय भारी

दिवंगत मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची शिस्तप्रिय, वक्तशीर आणि चारित्र्यसंपन्न नेते म्हणून ख्याती होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. काँग्रेसशी ते एकनिष्ठ राहून विधानसभेत दहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. पक्षाची पडझड होत असतानाही त्यांनी कॉंग्रेस प्रतीची निष्ठा बदलली नाही (Shivajirao Patil Nilangekar was known as a disciplined leader).

गांधीजींनी हिंदू-मुस्लिम ऐक्य ‘या’ चळवळीत घडवून आणले होते

राज्यपालांकडून पंडीत नेहरूंचा अवमान, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला संताप

लातूर, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यात खंडपीठाच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मागास भागात शिक्षणाची गंगा नेऊन तेथे शैक्षणिक संस्था उभारली. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविणारे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी शोधप्रबंधात मराठवाड्याच्या विकासाचा वेध घेतला. एम. ए. आणि एल. एल. बी. या दोन्ही पदव्युत्तर पदव्या त्यांनी एकदम मिळवल्या (Shivajirao Patil Nilangekar was the first Chief Minister to get a doctorate by writing a dissertation).

एम.डी. परीक्षेत आपल्या मुलीच्या गुणांमध्ये बदल केल्याचे समजल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली, परीक्षेतील मार्क वाढवून घेण्याबद्दल अनावश्यक दबाव आणल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यावर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतर त्यांना या प्रकरणात निर्दोष सोडण्यात आले असले तरी त्यांचे नुकसान झाले. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता, त्यांचा कार्यकाळ सर्वात अल्प मानला जातो (Shivajirao Patil Nilangekar had resigned from the post of Chief Minister due to his daughter’s merits).

Shivajirao Patil Nilangekar was known as disciplined leader
शिवाजीराव पाटील ह्यांना मुलीच्या गुणांमध्ये फेरबदल केल्याने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता

लोकमान्य टिळकांनी मुस्लीमांना वेगळे मतदारसंघ दिले, पंडित नेहरूंनी ते काढून घेतले; गांधींनी मुस्लिमांचे फाजिल लाड केले नाहीत

RBI Expert Panel Recommends Merger of Weaker Urban Co-op Banks (moneylife.in)

मुंबई विद्यापीठाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये झालेल्या एमडी (प्रसूती आणि स्त्रीरोग) परीक्षांचे निकाल जाहीर केले होते. निलंगेकर यांची मुलगी चंद्रकला यांना उत्तीर्ण करण्यासाठी केलेल्या अनियमिततेशी संबंधित काही पुरावे होते. एमडी पदवी मिळवण्यात आधीच तीन वेळा चंद्रकला ह्या अपयशी ठरल्या होत्या. सीलबंद परीक्षेच्या नोंदी उघडल्या आणि तपासल्या असे आरोप त्यांच्यवर लावण्यात आले होते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी