38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeIRCTC: तिकीट वेटिंगवर, चिंता नको; चालत्या ट्रेनमध्ये Online सीट मिळवण्याची सोपी पद्धत...
Array

IRCTC: तिकीट वेटिंगवर, चिंता नको; चालत्या ट्रेनमध्ये Online सीट मिळवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या 

अनेक जणांना विशिष्ट कारणासाठी किंवा एखादे काम अचानक आल्यावर रेल्वेने प्रवास करावा लागतो, त्यामुळे तिकीट बुक करून ते कन्फर्म करण्यासाठी त्यांची धांदल उडते. अचानक रेल्वेने प्रवास करावा लागला आणि तुमच्याकडे रिझर्वेशन तिकीट नसेल तर अशा परिस्थितीत आधी प्लॅटफॉर्म तिकीट विकत घेऊन ते घेऊन ट्रेनमध्ये चढावं लागतं. यानंतर तुम्हाला तिकीट तपासणीसाला गाठावं लागेल आणि तुमच्या प्रवासाची माहिती देत कुठे सीट उपलब्ध होऊ शकेल याची चाचपणी करावी लागत असे, ही जुनी पद्धत होती.

मात्र आता जर आपण वेटिंग तिकिटासह ट्रेनने प्रवास करत असाल आणि आपल्याला सीट हवे असेल, तर आपण काही मिनिटांत ट्रेनमधील रिकाम्या सीट शोधू शकता. यासाठी आपल्याला रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बर्थची स्थिती जाणून घ्यावी लागेल. याच्या सहाय्याने आपल्याला कोणता कोच रिकामा आहे, कोणता बर्थ रिकामा आहे आणि त्याचा क्रमांक काय? हे कळू शकते. यानंतर आपण ते सीट टीटीईच्या माध्यमाने आपल्या नावाने आरक्षित करू शकता. हे अत्यंत सोपे असून, यामुळे आपला प्रवासही सुखकर होईल.

IRCTC 
● आपल्याला ट्रेनमध्ये सीट बुक करायचे असेल, तर IRCTC च्या अधिकृत वेबसाइट जा, यावर आपल्याला होम पेजवर बुक तिकीट टॅब दिसेल.
● यावर पीएनआर स्टेटस आणि चार्ट/व्हॅकेन्सीचा टॅब दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर, रिझर्व्हेशन चार्ट आणि जर्नी डिटेलचा टॅब ओपन होईल.
● जर्नी डिटेल्सचा टॅब ओपन झाल्यानंतर, आपल्याला ट्रेन नंबर, स्टेशन आणि प्रावासाच्या तारखेसह बोर्डिंग स्टेशनचे नाव टाकावे लागेल.
● यानंतर क्लास आणि कोचच्या आधरे, सीट्सची माहिती मिळवू शकतात. कोणत्या कोचमध्ये कोणते सीट खाली आहेत, यासंदर्भातील संपूर्ण माहिती आपल्याला येथे मिळू शकते. अशा पद्धतीने आपण ट्रेनमधील खाली सीट्सची माहिती मिळवू शकता आणि सीट बुक करू शकता.

हे सुद्धा वाचा:

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्याच्या कानशीलात लगावत कॅन्टीनला ठोकले सील!

आता विनातिकीट प्रवाशांना बसणार डिजिटल फटका!

Railway New Rule : आता विनातिकीट रेल्वे प्रवासात टीसी रोखू शकणार नाही! वाचा काय सांगतोय नवा नियम

IRCTC, Waiting Tickets Online Seat, Railways, Railway Ticket, TT, TC, IRCTC : Railways Know Easy Way to Get Waiting Tickets Online Seat

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी