37 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रआयटीआय प्रशिक्षणार्थ्यांसाठी पंचतारांकित संधी

आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांसाठी पंचतारांकित संधी

टीम लय भारी

मुंबई : आयटीआय शिकणाऱ्या तरुणांची संख्याही आजही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळत नाहीत. अशी आजपर्यंत समाजाची बोंब होती. परंतु नव्या नियमानुसार आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पंचतारांकित हॉटेलांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे(ITI students to work in five star hotels).

राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलुंड येथील शासकीय आणि आयटीआय तसेच पंचतारांकित हॉटेलांची शृंखला असलेल्या आयटीसी हॉटेल लिमिटेड मध्ये सामंजस्य करार केला गेला. या विद्यार्थ्यांना यातून सहा महिन्यांसाठी नोकरीवर रुजू असतानाच फूड अँड बेवरेज क्षेत्रात प्रशिक्षण घेता येईल.

शुद्धीकरण करण्यासाठी ब्राम्हण लागतो, नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना खडेबोल

हर्षवर्धन पाटील : ‘भाजप’चा कोप झालेला नेता

ITI
विद्यार्थ्यांना यातून सहा महिन्यांसाठी नोकरीवर रुजू असतानाच फूड अँड बेवरेज क्षेत्रात प्रशिक्षण घेता येईल.

प्रशिक्षण घेतले तरी नोकरीच्या नावाने बोंब असते असे आपल्याला पहावयास मिळते, परंतु आता पूर्ण प्रशिक्षित विद्यार्थ्यांना खात्रीलायक रोजगार मिळण्यासाठी कौशल्य विकास विभाग प्रयत्नशील असणार आहे. आता यापुढे सगळ्याच आयटीआय प्रशिक्षण केंद्रांत अशी सुविधा सुरू करण्याबाबत विचार चालू आहे.

या करारामुळे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या करारावर मुलुंड आयटीआयचे प्राचार्य प्रदीप दुर्गे आणि आयसीटी हॉटेल चे व्यवस्थापकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना उत्तमप्रतिचा अनुभव सुद्धा मिळेल.

आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांसाठी पंचतारांकित संधी

या कारणामुळे 20 ऑगस्ट हा जागतिक मच्छर दिवस म्हणून साजरा केला जातो

चंद्रकांत पाटील यांचा जावईशोध, म्हणे ‘जम्मू – काश्मिर’ मध्ये ‘आदर्श लोकशाही’

याचबरोबर मुलुंड येथील आयटीआय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली डांबरी रस्त्यांचे उदघाटन केले आणि तेव्हाच संगणक कार्यशाळेचे मंत्री यांच्या हातून वृक्षारोपण काम करण्यात आले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक डॉ. अ म जाधव, उपप्राचार्य संदीप परदेशी आणि निरीक्षक अनिल सदाफुले उपस्थित होते.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी आयटीआयसाठी सध्या प्रवेशप्रक्रिया सुरु असून इच्छूक विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी