36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रऐन् निवडणुकीत तुमच्या बँक खात्यात १ हजार पेटीएमद्यारे आले असल्यास, ED चौकशी...

ऐन् निवडणुकीत तुमच्या बँक खात्यात १ हजार पेटीएमद्यारे आले असल्यास, ED चौकशी लावणार चंद्रकांत पाटलांचा इशारा !

टीम लय भारी 

कोल्हापुरा: कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीला काही दिवसांन पासून रंग चढला सुरुवात झाली आहे. याच पाश्ववभूमीवर विविध राजकीय नेते प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि महाविकासआघाडी विरोधात अनेक आरोप केले आहेत. (Chandrakant Patil in Kohlapur)

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil in Kohlapur) माध्यमांशी बोलत असताना अनेक मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं, पेटीएमच्या माध्यमातून मतदारांना पैसे देण्याची राजकीय पक्षची तयारी सुरु आहे, असं त्यांनी म्हटलं. कोल्हापूरात सत्तेसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांना पैश्यांची लालच दाखवून मत मिळवण्याची तयारी सुरू असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. १००० रुपये तुमच्या अकाऊंटला आले, तरी तुमची ईडी चौकशी होईल. आजच मी ईडीला पत्र लिहित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मोठ्या प्रमाणात काळात पैसा पेटीएमच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर होणार आहेत, असं पाटील म्हणाले. (Chandrakant Patil Alleges congress over Kolhapur North by Poll 2022)

पाच राज्यातील निवडवुणकीच्या विजया नंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमध्ये भाषण केले. या भाषणात मोदी म्हणाले आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून हि निवडवूक लढू. एका काँग्रेसच्या नेत्याने दारूच्या दुकान मालकांची बैठक घेतली. एका अधिकाऱ्याने काँग्रेसला मतदान करण्याचा दम देखील भरला. मात्र, भाजप हे मान्य करणार नाही, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil in Kohlapur) म्हणाले.

आम्ही या अधिकाऱ्यांना घेराव घालू. पीडीसीसीत दमबाजी, गोकुळमध्ये दमबाजी सुरू आहे. या सगळ्या खाजगी संस्थान धमकी दिली जात आहे. आपल्या घरचे नोकर असल्या प्रमाणे त्यांना वागणुक दिली जात आहे. पण भाजपं तसं होऊ देणार नाही, असं पाटील यांनी म्हटलं.

हे सुध्दा वाचा : 

Narendra Modi: दो घंटे सोते हैं पीएम मोदी, अब देश के लिए चौबीसो घंटे जगने की करेंगे कोशिश-चंद्रकांत पाटिल

चंद्रकांत पाटील वापरतात दोन मोबाईल फोन, पण दोन्ही जुनाट जमान्यातले !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी