28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री महापालिकेत आले, भाजप - सेना नेत्यांनी त्यांचा सत्कार केला

मुख्यमंत्री महापालिकेत आले, भाजप – सेना नेत्यांनी त्यांचा सत्कार केला

लय भारी टीम

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर इकडे मुंबईकरांना सुद्धा पावसाने चांगलेच वेठीस धरले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुंबईतील पावसासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी काल मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास भेट दिली, यावेळी भाजप – सेना नेत्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

मुंबई आणि मुंबई उपनगरांत गेल्या 24 तासांपासून पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. त्यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी काल (दि. 5 जुलै) महापालिकेत हजेरी लावली.

यावेळी अधिकाऱ्यांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रेल्वेचे 25 स्पाॅट जिथे पावसामुळे रेल्वे बंद झाल्यावर नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी उपनगरी रेल्वे विभाग, बेस्ट, मुंबई महापालिका यांनी समन्वय साधून लोकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी तसेच त्यांच्या नाश्ता – पाण्याची सोय देखील करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

तसेच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये असणाऱ्या सीसीटीव्हींद्वारे संपुर्ण पावसाच्या सद्यस्थितीवर पुर्णपणे नियंत्रण कक्षाने लक्ष ठेऊन सर्वसामान्य नागरिक पावसामुळे कुठे अडचणीत सापडल्यास तात्काळ मदत करावी, असे सुद्धा एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेला भेट दिली, त्यावेळी भाजप – सेना नेत्यांकडून नवनियुक्त मुख्यमंत्री शिंदे यांचे पुष्पगुच्छ आणि शिवाजी महाराजांची प्रतिकृती भेट देऊन सत्कार करण्यात आला.

हे सुद्धा वाचा :

शहाजीबापू पाटील सांगोल्यात परतले अन् म्हणाले, बोकडाचं मटण कसे ओरपायचे ते शिकवतो

राज ठाकरेंचं पत्र ‘इन्सपायरिंग‘ होतं – फडणवीस

‘शिवसेनेला उद्धव ठाकरेच वाचवू शकतात, शिंदेंना भाजपा गिळंकृत करणार’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी