30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक : पुणे महापालिकेत नगरसेवकांसह 108 कर्मचाऱ्यांना कोरोना!

धक्कादायक : पुणे महापालिकेत नगरसेवकांसह 108 कर्मचाऱ्यांना कोरोना!

टीम लय भारी

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात वाढला असून पुणे महापालिकेत नेहमीच वावर असलेल्या काही नगरसेवकांसह पालिकेचे तब्बल 108 अधिकारी आणि कर्मचा-यांना कोरोनाने घेरले  आहे. त्यामुळेच भविष्यात पुणे महानगरपालिकेची इमारतच ‘हॉट स्पॉट’ ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे (PMC may become Corona Hotspot). विविध कामांसाठी पालिकेत शेकडो नागरिक येत असल्याने पालिकेत संसर्गाचा धोका वाढला आहे.

महापालिकेचे आतापर्यंत 108 अधिकारी-कर्मचारी बाधित झाले आहेत. यातील 10 कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. कोरोना बाधितांमध्ये 44 सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण 108 कर्मचाऱ्यांपैकी 53 जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर 45 जणांवर अजूनही उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 हजार 181 पर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 560 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. 10 हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना बाधित रुग्ण वाढल्यामुळे हवेली तालुक्यातील मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये देखील वाढ करण्यात आली. वाघोली परिसरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या घटली आहे. परंतु हवेली तालुक्यात 6 जून रोजी प्रतिबंधित क्षेत्राची संख्या 31 होती, ती आता 45 पर्यंत वाढली आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी