30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारने 'स्थगिती सरकार' अशी प्रतिमा बनवू नये -अशोक चव्हाण

सरकारने ‘स्थगिती सरकार’ अशी प्रतिमा बनवू नये -अशोक चव्हाण

टीम लय भारी

नांदेड: माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेतली. गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या घडामोडींवर त्यांनी भाष्य करणे टाळले. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री होते. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजुर झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला.अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हयातील अनेक प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारने थांबवले आहेत. परंतु ते प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली.

शिवसेनेविरुध्द बंड केल्यामुळे या सरकावर ठपका ठेवला जात आहे. या सरकारने स्थगिती सरकार अशी आपली प्रतिमा करु नये. कारण राज्यातील अनेक विकास कामांना स्थगिती शिंदे फडणवीस सरकारने दिली आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही एकमेंकांचे शत्रू नाहीत असा उल्लेख केला होता.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना 2014 ते 2019 या काळात मराठवाडयाचा विकास झाला नाही. परंतु महाविकास आघाडीच्या काळात रखडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मागील 5 वर्षांच्या काळात मराठवाडयावर अन्याय झाला. तसेच नांदेडचा विकास झाला नाही.

जालना नांदेड समृध्दी महामार्गचा निर्णय झाला साधारण 12 हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. त्याची पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद झाली. हा विषय मार्गी लागावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुंबई जालना हैद्राबाद बुलेट ट्रेनचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे. नांदेड लातूर महामार्ग. मध्य गोदावरी व पैनगंगा प्रकल्प. सुधार प्रकल्प. मराठवाडयाच्या विकासासाठी एकूण 12 ते 15 प्रकल्प रखडले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

एकनाथ शिंदें नगर विकास मंत्री असतांना मंजूर झालेली कामे स्थगीत करण्यात आली आहे. विदयमान सरकारकडून सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करु. आगामी काळात विरोधी पक्षाचा आमदार म्हणून प्रयत्न करु. फडणवीसांनी सकारात्मक विधान केले आहे. त्यामुळे या कामात खंड पडणार नाही.

हे सुध्दा वाचाः

ब्रिटनमध्ये पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ‘ऋषी सुनक‘ आघाडीवर

नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देऊन सन्मान

एकनाथ शिंदेंनी बायको, सुन, नातवंडाला मंत्रालयात नेले, अन् काम सुरू केले !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी