29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रटोल कर्मचारी आणि वारकऱ्यांमध्ये रंगली जुगलबंदी

टोल कर्मचारी आणि वारकऱ्यांमध्ये रंगली जुगलबंदी

टीम लय भारी

सोलापूर: नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कागदपत्रांचे वावडे आहे. मुख्यमंत्री फोनव्दारे अधिकाऱ्यांशी संपर्क साधतात. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे जीआर संबंधीत कार्यालयांमध्ये पोहोचतात का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आषाढी वारीला पंढरपूरकडे जाणाऱ्या गाडयांकडून टोल न घेण्याची घोषणा केली. मात्र काही ठिकाणी टोल कर्मचारी वारकऱ्यांच्या गाडया आडवतात. त्यामुळे सोलापूरमधील वाळेश्वर टोल नाक्यावर जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाली.

सावळेश्वर टोल नाक्यावर वारकऱ्यांची गाडी आली असता त्यांना अडवण्यात आले. वारकऱ्यांनी टोल कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोल माफी केल्याचे सांगितले. मात्र टोल कर्मचाऱ्यांनी कोण मुख्यमंत्री असा प्रतिप्रश्न केला. आमच्याकडे टोल माफीचा जीआर आला नसल्याचे सांगितले. टोल कर्मचारी आणि वारकऱ्यांमध्ये काही वेळ वाद रंगला होता. त्यामुळे एकनाथ शिंदेंची टोलमाफी कागदावच असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

कालपासून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाडयांना टोल आकारले नाही, असे अनेक वारकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हा जीआर सगळयांकडे आला आहे का? नाही आला हेच नेमके समजले नाही. वारकऱ्यांसोबत सावळेश्वर टोळ नाक्यावर जुगलबंदी रंगली होती. मात्र वारकऱ्यांच्या गाडयांना टोल न आकरल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्टकरण दिले आहे. मुख्यमंत्री टेबलावरच्या कागदपत्रांना महत्व देत नाही असे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले होते. त्यामुळे आता प्रत्येक निर्णय हा केवळ फोनव्दारे अथवा घोषणाव्दारेच घेणारा का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे सुध्दा वाचा:

जपानच्या माजी पंतप्रधानांवर जिवघेणा हल्ला

उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप! ‘जे’ गेले ते घातपात करून गेले…

‘दलित पँथर’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी