31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यपालांनी पुस्तकाचे प्रकाशन केले, अन् खिशातले पैसे देवून ते विकतही घेतले !

राज्यपालांनी पुस्तकाचे प्रकाशन केले, अन् खिशातले पैसे देवून ते विकतही घेतले !

टीम लय भारी 

मुंबई: ज्येष्ठ संपादक व लेखक राजा माने यांच्या “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”या पुस्तकाचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांच्या हस्ते झाले आहे.

या कार्यक्रमाला माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, लोकमत माध्यम समुहाचे चेअरमन माजी खासदार विजयबाबू दर्डा यांची उपस्थिती होती. governor bhagat singh koshyari published books

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राजकीय जडणघडणीत योगदान देणाऱ्या ७५ व्यक्तींचे केलेले चरित्रात्मक वर्णन सुंदर, सजीव व प्रेरणादायी झाले असून त्यांचे पुस्तक घरोघरी पोहोचावे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांनी केले आहे.

देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे तसेच महाराष्ट्र राज्य देखील आपले हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. अश्यावेळी राज्यातील ७५ प्रतिभावंत व्यक्तींचे व्यक्तीचित्रण करणे व त्याला सुंदर रेखाचित्रांची जोड देणे हा नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. he book contains biographical sketch and illustrations of 75 leading personalities of Maharashtra.

राजा माने यांनी आपल्या पुस्तकातून राज्यातील हिरेही दाखवून दिले आणि अमृतही दिले असून त्याचे रसपान वाचकांनी करावे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. Governor Koshyari releases book by journalist – editor Raja Mane

पुस्तक विकत घेऊनच वाचावे (Governor Says by the book and read)

राज्यपाल यांनी  स्वतः पैसे देऊन ‘ज्यांनी आभाळ कवेत घेतलं’ या पुस्तकाची प्रत विकत घेतली. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी पुस्तकाच्या प्रती उपस्थितांना मोफत देण्याच्या प्रथेला विरोध करताना प्रत्येकाने पुस्तक विकत घेऊनच वाचावे अशी आग्रही सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी केली. (Governor Says by the book and read)

आजकाल समाजात कर्तृत्व व नम्रता हे गुण एकत्र अभावाने आढळतात असे मत व्यक्त करताना राजा माने यांनी प्रेरणादायी व्यक्तींच्या जीवनावरील पुस्तक दिल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

तर, महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी असलेली सुसंवादाची परंपरा पुन्हा यावी असे मत विजय दर्डा यांनी व्यक्त केले. Governor Koshyari releases book by journalist – editor Raja Mane

यावेळी चित्रकार नितीन खिलारे यांनी काढलेल्या व पुस्तकात समाविष्ट केलेल्या व्यक्तींच्या व्यक्तीचित्रांच्या प्रदर्शनाला राज्यपालांनी भेट दिली. सोलापूर येथील शिवरत्न शेटे व संतोष ठोंबरे यांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले. Governor Says by the book and read

हे सुध्दा वाचा: 

शिवसेनेचा राज्यपालांवर हल्लाबोल, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजप प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे वागतायत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि स्टार्टअप्सचा घेतला आढावा

नेते मंडळी खूप भांडतात, धर्मावरून लढतात, पण…” लोणावळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं वक्तव्य

जरंडेश्वर साखर कारखाना मूळ सदस्यांना सोपवावा – किरीट सोमय्या

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी