31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रआई- वडील सोडून काहीही बोला ; सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्र्यांना सुनावले

आई- वडील सोडून काहीही बोला ; सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्र्यांना सुनावले

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र सिंहांमध्ये जम्मू लोकसभेत शाब्दिक चकमक रंगली. सुप्रिया सुळे यांनी जम्मू काश्मीरच्या अर्थसंल्पावर झालेल्या चर्चेत संसदेत सहभागी झाल्या. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही आज लोकसभेत पोहोचला आहात. तुम्हाला इथे बोलता येईल यासाठी त्यांनीच तुम्हाला लायक बनवले आहे. जितेंद्र सिंह यांच्या या विधानावर सुप्रिया सुळे चांगल्याच नाराज झाल्या. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनलेला तुम्हाला चालतो, मग आमची तुम्हाला काय अडचण आहे, असा सवाल त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना केला. त्यानंतरदेखील माझ्या आई-वडिलांचा मला अभिमानच आहे; पण इथे आई-बाप काढू नका, असेही त्यांनी सुनावले.

सुप्रिया सुळे यांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाबाबत भरपूर बोलले. मात्र ज्या काश्मिरी पांडितांच्या मुलांसाठी दिल्लीत शाळा सुरु आहे. त्या शाळेला केंद्र सरकारच्या विविध विभागाकडून का नोटीसा दिल्या जातात ? असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला. दुसऱ्यावर आरोप करणं हे नक्कीच सोपं असतं मात्र तुम्ही काश्मीरमध्ये काय विकास केला ? हे देखील समोर आणा, असा टोला त्यांनी लगावला आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी