31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह

टीम लय भारी

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना  रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेतेमंडळींभोवतीही  कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. हिवाळी अधिवेशनानंतर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील 1३ मंत्र्यांसह विविध पक्षांतील( Minister of State for Health  Bharti Pawar Corona Positive)

जवळपास 70 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांचे सहाय्यक खासगी सचिव म्हणून ओमप्रकाश शेट्ये यांची नियुक्ती

विद्यापीठांमध्ये नवीन वर्षाचे निर्बंध, पुन्हा लॉकडाऊन.. ?

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना ही कोरोना ची लागण झाली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू आहेत. भारती पवार यांनी माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची टेस्ट करून घेण्यासाठी आव्हान केले आहे”.

असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन दिवस नाशिक-मुंबई दौरा झाल्यानंतर डॉ. भारती पवार यांना त्रास जाणवू लागा. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली.

कोरोना पॉझिटिव्ह बहिणीचा धनुभाऊंना काय रिप्लाय?

BJP Blames Congress for Sabotaging PM’s Rally; ‘Only 700 People Had Turned Up,’ Says Channi

राज्यातील अनेक नेते, लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

तर नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही कोरोनाची लागण झाल्याची त्यांनी माहिती दिली आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी