24 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरराजकीयअजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यालयात 'एकच' राष्ट्रीय नेते !

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यालयात ‘एकच’ राष्ट्रीय नेते !

ऱाष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जनतेची विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण सत्तेत सहभागी झाल्याचे अजित पवार यांनी त्यावेळी म्हटले होते. अजित पवार यांनी आता पक्षाची बांधणी सुरु केली असून त्यांच्या गटाचे स्वतंत्र कार्यालय मंत्रालयाच्या अगदी समोरच थाटले आहे. या कार्यालयात केवळ अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला असून त्यांच्या कार्यालयात आता एकमेव राष्ट्रीय नेते म्हणून अजित पवारच असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.

जुलै महिन्यात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या सवत्यासुभ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधले दुभंगलेपण समोर आले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर उर्वरीत आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन्ही गटांकडून सभा, मेळावे देखील पार पडले. सुरुवातीच्यावेळी अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा फोटो बॅनरवर लावण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अजित पवार गटाकडून पक्षावर दावा सांगतानाच शरद पवार आमचे नेते असल्याचे देखील सांगितले जात होते.

मात्र शरद पवार यांनी अजित पवार गटासोबत आपण नसल्याचे जाहीर केले. तसेच अजित पवार गटाने आपला फोटो देखील वापरू नये असा इशारा दिला. अजित पवार गटाकडून मंत्रालयाशेजारी कार्यालय थाटले त्यावेळी शरद पवार यांचा फोटो कार्यालयात लावला होता. मात्र पवार यांच्या इशाऱ्यानंतर शरद पवार यांचा फोटो वापरणे अजित पवार गटाने आता बंद केल्याचे दिसते.

हे सुद्धा वाचा 
मंत्रालयाबद्दल IPS देवेन भारतींनी चिंता व्यक्त केली, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी त्यावर उपाय शोधून दिला !
मुख्यमंत्र्यांनी दाखवली ३० देशांच्या नामवंतांना भारतीय संस्कृती
मंत्रालयात उड्या मारणाऱ्यांवर जाळीचे कोंदण !

मंत्रालयासमोरील अजित पवार गटाच्याव नव्या कार्यालयात केवळ अजित पवार यांचा फोटो लावलेला दिसून येत आहे. मुंबईत बेलार्ड इस्टेट येथे राष्ट्रवादीचे कार्यालय आहे. जे शरद पवार गटाकडे आहे. पूर्वी या कार्यालयात राष्ट्रवादीचे सर्व नेत्यांचा वावर असे आता अजित पवार यांनी नवे कार्यालय थाटल्यापासून त्यांच्या गटाच्या या नव्या कार्यालयात बैठका, भेटी होत असतात.

अजित पवार सध्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राज्यातून अनेक लोक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी अजित पवार याच्या भेटीसाठी याच कार्यालयात येत असतात. तसेच मुंबईत मंत्रालयात कामासाठी येत असतात मात्र काही कारणाने मंत्रालयात प्रवेश मिळाला नाही तर हे लोक अजित पवार यांच्या या कार्यालयात त्यांची कामे घेऊन भेटीसाठी येतात.
कार्यालय मंत्रालयापासून अगदी जवळच असल्याने सध्या येथे लोकांचा मोठ्याप्रमाणात राबता असतो. त्यातच अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळतानाच पक्षबळकटीवर देखील भर देत आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यापासून लोकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी ते वेळ देत आहेत. या सर्व घडामोडीपाहता पक्षप्रमुख म्हणून आपली प्रतिमा लोकांपर्यत पोहचविण्यासाठी त्यांनी मोका साधला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी