31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमंत्रालयअजितदादांची मोठी घोषणा राज्याची अर्थव्यवस्था होणार एक ट्रिलियन डॉलर्सची !

अजितदादांची मोठी घोषणा राज्याची अर्थव्यवस्था होणार एक ट्रिलियन डॉलर्सची !

टीम लय भारी

राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या नव्या तरतुदींमुळे देशभरात एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल, असं अजिच पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता आपल्या राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स होणार आहे.

अर्थसंकल्पातील सर्वात मोठ्या घोषणा

राज्यातील हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली , सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर ,रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड या शहरात प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळणार आहे.

फिजीओथेरपी शाखेचा वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात येणार आहे. तसेच नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा येथे प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारणार.

1 लाख 20 हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना ई शक्ती योजनेतून मोबाईल सेवा दिली जाणार आहे.

शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिंनीसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्‍सिंग मशिन दिली जाणार आहे.

छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरु करणार. तसेच ता.हवेली जि.पुणे या परिसरात स्मारकासाठी 250 कोटी रुपये निधी उपलब्ध दिला जाणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरूषांशी संबंधित गावांतील 10 शाळांकरिता 10 कोटी रुपये निधी

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत रोजगाराच्या 3 लाख 30 हजार नवीन संधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 1 लाख रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी