30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
HomeमुंबईMaharashtra Assembly Session : बॅनर झळकावणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे आदित्य ठाकरेंनी काढले संस्कार

Maharashtra Assembly Session : बॅनर झळकावणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे आदित्य ठाकरेंनी काढले संस्कार

सत्ताधाऱ्यांमधील शिंदे गटाच्या आमदारांकडून शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात पोस्टर झळकवून घोषणाबाजी करण्यात आली. ज्यामुळे आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर सडकून टीका केली.

महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात काल पासून सुरु झालेला गदारोळ हा आज (ता. २५ ऑगस्ट) देखील कायम आहे. काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा राडा झालेला पाहायला मिळाला. इतकेच काय तर सत्ताधाऱ्यांच्या शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि विरोधकांमधील आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली. यामुळे काही वेळेसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण आजसुद्धा सत्ताधाऱ्यांमधील शिंदे गटाच्या आमदारांकडून शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याविरोधात पोस्टर झळकवून घोषणाबाजी करण्यात आली. ज्यामुळे आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर सडकून टीका केली. सत्ताधारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर करत असलेल्या पोस्टरबाजीवरून त्यांचे संस्कार दिसून येत आहेत, असे मत आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

शिंदे गटातील आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर यावेळी ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (प पु) युवराज’ अशा आशयाखाली व्यंगचित्र असलेला बॅनर झळकावला. पण याबाबत जेव्हा आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी शिंदे गटातील आमदारांविषयी मला सहानुभूती आहे. मंत्रिपद मिळावं आणि इम्प्रेस करण्यासाठी माझ्याविरोधात घोषणाबाजी करण्यात येत असल्याचे आदित्य ठाकरे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

‘मला पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांची कीव येते. त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत आहे. शिवसेनेला वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांची अशी परिस्थिती आहे. त्यांच्यावर झालेले संस्कार आज त्यांनी दाखवले आहे,’ असा टोलादेखील आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला. तसेच पर्यटन मंत्र्यांनी फिरायला जायचे नसते तर त्यांनी पर्यटनाविषयीची कामे करायची असतात, असेही आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले.

५० खोक्यांचा आरोप आमच्याकडून करण्यात आला नाही. ते तर जनतेकडून आणि मीडियाकडून आम्हाला कळलं. पण ५० खोके हा शब्द त्यांच्या जिव्हारी लागलेला असल्याचे दिसून येतंय. आमच्याविरोधात घोषणाबाजी करण्यासाठी पायर्यांवर येऊन बसले पण हेच जर का लोकांच्या प्रश्नांना घेऊन बसले असते तर त्यांचे कौतुक वाटले असते, आहि प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Monsoon Session 2022 : आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांना बनवला ‘कुस्तीचा आखाडा’

Maharashtra Monsoon Session 2022 : शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले झाले आक्रमक

Andheri East By Poll Election : मुंबईत होणार शिवसेना वि. शिंदेसेनेचा सामना ?

दरम्यान, शिंदे गटातील आमदारांनी झळकवलेल्या बॅनरमध्ये एका घोड्यावर आदित्य ठाकरेंचे व्यंगचित्र बनवून ते बसविण्यात आले आहे. पण यामध्ये त्या घोड्याचे तोंड हे हिंदुत्वाच्या दिशेने असून आदित्य ठाकरे यांचे तोंड हे
महाविकास आघाडीच्या दिशेने असल्याचे दिसून येतंय. तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर या बॅनरच्या माध्यमातून शिंदे गटाकडून वैयक्तिक हल्ला देखील चढविण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी