33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeमुंबईMaharashtra Assembly Session : गद्दारी केलेल्यांनी राजीनामा द्यावा : आदित्य ठाकरे

Maharashtra Assembly Session : गद्दारी केलेल्यांनी राजीनामा द्यावा : आदित्य ठाकरे

पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी तर शिंदे गटातील आमदारांनी आदित्य ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे बॅनर देखील झळकावले. पण यावेळी मात्र आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदे गटातील 40 आमदारांना राजीनामा देण्याचे आव्हान करण्यात आले.

ठाकरे कुटुंबावर किंवा मातोश्रीवर टीका करणार नाही असे म्हणणाऱ्या शिंदे गटाकडून थेट आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), उद्धव ठाकरे आणि मातोश्रीला लक्ष केले जात आहे. पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी तर शिंदे गटातील आमदारांनी आदित्य ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे बॅनर देखील झळकावले. पण यावेळी मात्र आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदे गटातील 40 आमदारांना राजीनामा देण्याचे आव्हान करण्यात आले. हे सरकार घटनाबाह्य आणि नियमबाह्य आहे, असेही यावेळी आदित्य ठाकरे यांच्याकडून सांगण्यातून आले. तसेच लवकरच गद्दारीचा मुखवटा फाडणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. सध्याचे राज्य हे रावण राज्य आहे, राम राज्य नाही असा टोला देखील आदित्य ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांना लगावण्यात आला.

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गटातील आमदारांनी घोषणाबाजी करत बॅनर झळकावले. या बॅनरमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांचे व्यंगचित्र देखील बनवले होते. पण यामध्ये आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना त्यांच्याकडे असलेल्या पर्यटन खात्याविषयी या बॅनरच्या माध्यमातून बोचरी टीका करण्यात आली आहे. पण आदित्य ठाकरे यांनी सुद्धा शिवसेनेशी गद्दारी केलेल्या 40 आमदारांना मंत्रिपदाचा राजीनामा द्या, आणि निवडणुकीला सामोरे जा असे आव्हान दिले आहे.

इम्प्रेस करण्यासाठी आणि मंत्रिपद मिळविण्यासाठी शिंदे गटातील आमदारांनी माझ्याविरोधात घोषणा दिल्या आहेत. पण हे सरकार घटनाबाह्य आणि नियमबाह्य आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करून निवडणुका लावण्यात याव्या. मग सगळं काही समोर येईल. इतकेच नाही तर लवकरच गद्दारांचे मुखवटे फाडणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, सरकारकडून मंत्र्यांना बंगले घोषित करण्यात आले पण राज्यातील जिल्ह्यांसाठी महत्वाचे असलेले पालकमंत्री अद्यापही घोषित करण्यात आलेले नाहीत. हे खर्च खूप दुर्दैवी आहे. सध्या जिल्ह्यांना पालकमंत्र्यांची अधिक गरज आहे, पण या सरकारला मंत्र्यांना मिळणाऱ्या सुविधा हव्या आहेत, परंतु कोणालाच जनतेची जबाबदारी घ्यायची नाहीये, असे मत आदित्य ठाकरे यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.

परंतु आता लवकरच मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये आमदार रमेश लटके यांचे मे महिन्यामध्ये निधन झाल्याने पोट निवडणुकीची घोषणा होऊ शकते. यावेळी मात्र शिवसेना विरुद्ध शिंदेसेना असा सामना रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अंधेरी पूर्व विधानसभेची जागा भाजप-शिंदे युतीकडून शिंदे गट लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाकडून 2019 मधील अपक्ष उमेदवार मुरजी पटेल हे शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Assembly Session : बॅनर झळकावणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे आदित्य ठाकरेंनी काढले संस्कार

Maharashtra Assembly Session : ‘शिंदे गटाची ताकद आता पन्नास खोक्यांपुरतीच?’

Maharashtra Monsoon Session 2022 : आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांना बनवला ‘कुस्तीचा आखाडा’

दरम्यान, पावसाळी अधिवेशनात सुरु असलेल्या या गदारोळामुळे मात्र सामान्य जनतेचे प्रश्न कितपत आणि कधी सोडवले जाणार असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. राज्याच्या सत्तेत आणि विरोधकांच्या बाकावर बसलेले राजकारणीच एकमेकांसोबत हाणामारी करू लागल्याने सामान्य जनतेने कोणाकडे आपले प्रश्न मांडायचे आणि समस्या सोडविण्याची अपेक्षा करायची ? तर राजकारणीच हाय व्होल्टेज ड्रामा करू लागल्याने राजकारण्यांची प्रतिमा नक्कीच मलीन होऊ लागली हे निश्चित आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी