28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रAshtavinayaka Darshan : अष्टविनायक दर्शन- त‍िसरा गणपती भीमेच्या तिरावरचा 'सिद्धटेकचा' सिद्धिविनायक

Ashtavinayaka Darshan : अष्टविनायक दर्शन- त‍िसरा गणपती भीमेच्या तिरावरचा ‘सिद्धटेकचा’ सिद्धिविनायक

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी 'तिसरा' गणपती आहे. तो उजव्या सोंडेचा आहे. अष्टविनायकांपैकी तो एकमेव गणपती उजव्या सोंडेचा आहे.

 ‘अष्टविनायक’ म्हणजे आठ विनायक म्हणजेच गणपती. गणपतीला विनायक या नावाने देखील ओळखतात. गणपती हा महाराष्ट्रातल्या प्रिय दैवतांपैकी एक आहे. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी गणपतीची पूजा केली जाते. गणपती हे व‍िद्येचे दैवत आहे. तो सर्व प्रकारची विघ्नंन दूर करतो. समृद्धी प्रदान करतो. अशा सर्वांच्या आवडत्या बाप्पाची आठ मंद‍िरे ही अष्टविनायक या नावाने ओळखली जातात. या आठही मंद‍िरांची स्थापत्यकला अतिशय उत्कृष्ठ असून, ती मनाला सुखावणारी आहे. सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती आहे. तो उजव्या सोंडेचा आहे. अष्टविनायकांपैकी तो एकमेव गणपती उजव्या सोंडेचा आहे.

हे स्थान भीमा नदीवर वसलेले स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने प्रशस्त आहे. तसेच सभा मंडप देखील प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदीराचा जीर्णोद्धार केला. या मंद‍िरात पितळी मखर असून, त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून, दौंडपासून 19 किमी अंतरावर आहे. तर राश‍िनपासून 23 किमी अंतरावर आहे. दौंडहून गेल्यास भीमा नदी लागते. ती ओलांडायला होड्या देखील असतात. आता पूल देखील झाला आहे. हे मंद‍िर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा गावापासून 48 किमी अंतरावर पुणे सोलापूर महामार्गावर आहे. हे मंद‍िर उत्तराभ‍िमुख आहे.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Assembly Session : ‘शिंदे गटाची ताकद आता पन्नास खोक्यांपुरतीच?’

Maharashtra Assembly Session : बॅनर झळकावणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे आदित्य ठाकरेंनी काढले संस्कार

Internet :ऑक्टोबरमध्ये ‘5 जी’ इंटरनेट सेवा सुरु होऊ शकते

गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. गणपतीच्या मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. तसेच गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या मूर्ती आहेत. या मंद‍िरापासून जवळच राशीन येथील झुलती दीपमाळ आणि देवीचे मंदिर आहे. तसेच पेडगांव येथील प्राचीन मंद‍िर आण‍ि भिगवण पक्षी अभयारण्य आणि रेहेकुरी अभयारण्य देखील जवळ आहे. पुण्याहून दौंड मार्गे सिद्धटेक 115 किमी आहे. तर पुण्याहून भ‍िगवणमार्गे सिद्धटेक हे 145 किमी आहे.

तर मोरगावहून हे अंतर दोन तासांच्या अंतरावर आहे. महत्वाचे म्हणजे आठही अष्टविनायकांच्या ठिकाणी भोजनाची आणि निवासाची उत्तम व्यवस्था आहे. तसेच राज्य परिवहन मंडळाच्या व‍िशेष बसची व्यवस्था देखील आहे. खासगी टुर कंपन्या देखील टूरचे आयोजन करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांचे र‍िसोर्ट उपलब्ध आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी