30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयशिवेंद्रसिंहराजे यांचा शशिकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार घाणाघात

शिवेंद्रसिंहराजे यांचा शशिकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार घाणाघात

टीम लय भारी

कुडाळ :  मी कोणत्याही पक्षात असलो तरी विकासकामांत कुठेही अडचण आलेली नाही आणि कधी येणारही नाही. जे लोक तालुक्यात कार्यरत आहेत, तुमच्या सुखदु:खात तुमच्या सोबत आहेत त्यांच्या बरोबर, त्यांच्या पाठीशी ठाम राहा. मृगजळ बनून बाहेरून येणाऱ्यांच्या पाठीमागे धावू नका. राजकारणापेक्षा जावलीच्या विकासाला कायम प्राधान्य दिले असून जावलीतील जनतेला सोडून मी कधीही जाणार नाही, असा शब्द देताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नाव न घेता शशिकांत शिंदे यांच्यावर टिका केली.(Shivendra Singh Raje did not mention Shashikant Shinde).

सर्जापुर ग्रामपंचायतीच्या नुतन बहुउद्देशीय इमारतीचे भूमीपूजन तसेच बर्गे वस्ती रस्ता खडीकरण, सटवाई रोडचे डांबरीकरण व लसीकरण कँम्पचे उदघाटन अशा विविध विकासकामांचे भूमीपूजन व उदघाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. कार्यक्रमास जावलीचे उपसभापती सैारभ शिंदे, माजी सभापती अरूणा शिर्के, जयदिप शिंदे, प्रकाश मोहिते, सरपंच स्वागता बोराटे, उपसरपंच शंकर मोहिते, देविदास बोराटे, मयुर बाबर, सारिका मोहिते, सुरेखा मोहिते, मनिषा बोराटे यांच्यसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

खाण पट्टा मिळावा यासाठी वडार समाजाचा कराडात गाढव मोर्चा

खासदार सुप्रिया सुळेंचे ट्विट, अन् पोलिसांची पळापळ

गेल्या 12 वर्षापासून जावलीच्या जनेतेसाठी मी झटत आहे. विकासकामांत मी कधीच सातारा जावली असा भेदभाव केला नाही व कधी करणारही नाही. विकासकामांबरोबरच तालुक्यातील सर्व अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने केला आहे.

Shivendra Singh Raje did not mention Shashikant Shinde
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नाव न घेता शशिकांत शिंदे यांच्यावर केली टिका

रोहित पवारांचा पुढाकार, गटसचिवांचे प्रश्न मांडले मंत्रालयात !

Maharashtra News LIVE Updates: CM Uddhav Thackeray meets injured civic official Kalpita Pimple

तुमच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी मी कायम तत्पर असून जो खऱ्या अर्थाने तुमची कामे करतो त्याच्या पाठीशी कायम रहा, असे आवाहन त्यांनी केले. अतुल बोराटे यांनी सुत्रसंचालन केले. नितिन मोहिते यांनी प्रास्ताविक केले. किर्तनकार नलावडे यांनी आभार मानले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी