29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदेंनी वाहिली आनंद दिघेंना श्रद्धांजली

एकनाथ शिंदेंनी वाहिली आनंद दिघेंना श्रद्धांजली

टीम लय भारी

ठाणे : स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन आशीर्वाद घेतले (Eknath Shinde greeted Anand Dighe on his death anniversary).

आनंद दिघे यांच्या 20 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृती जतन केलेल्या आनंदाश्रम येथे उपस्तिथी दिली. त्याचबरोबर ठाणे टेंभी नाका येथील दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

आनंद दिघेंनी ठाण्यात शिवसेना वाढविली, त्यांचा वारसा एकनाथ शिंदेनी चालवला

मंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात नवे खासगी सचिव

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या समाधी असलेल्या शक्तीस्थळाला भेट दिली. तेथील त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्रपणे अभिवादन केले. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शक्तीस्थळावर दिघे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भजनाचे आयोजन करण्यात आले होते (Eknath Shinde visited the Shaktisthala where Anand Dighe was buried)

Eknath Shinde greeted Anand Dighe on his death anniversary
एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन पुष्पहार अर्पण केला

चिपळूण शहर स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Stay within your limits, Shiv Sena will remain Shiv Sena: Sanjay Raut

आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिकेला 3 रुग्णवाहिका दिल्या. या रुग्णवाहिकांच्या लोकार्पण सोहळ्याला एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती. त्यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

Eknath Shinde greeted Anand Dighe on his death anniversary
प्रताप सरनाईक यांनी दिघे यांच्या स्मृती दिनानिमित्त 3 रुग्णवाहिका ठाणे महानगरपालिकेला दिल्या

एकनाथ शिंदेंनी नेहमीच आनंद दिघे यांना आपले गुरू मानले. आनंद दिघे यांना ठाणे जिल्ह्यात जेवढा पूर्वी मान होता, तेवढाच मान त्यांना जाऊन 20 वर्षे झाली तरी देखील आहे. शिवसेनेशी त्यांची असलेली प्रामाणिकता नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तम उदाहरण आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी