30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयभीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना नोटीस; साक्ष नोंदवण्यासाठी राहावे लागणार उपस्थित!

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना नोटीस; साक्ष नोंदवण्यासाठी राहावे लागणार उपस्थित!

टीम लय भारी

पुणे:- भीमा-कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यासाठी न्यायालयात उपस्थित राहण्याची नोटीस आली आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता.(Notice to Sharad Pawar in Bhima Koregaon violence case)

शरद पवार यांनी भीमा कोरेगाव येथील हिंसाचार हा संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं विधान केलेलं.त्या प्रकरणी शरद पवारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांना कोरोनाची लागण

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीत नवे आर. आर. पाटील उदयाला येत आहेत

राष्ट्रवादी ३ राज्यांच्या निवडणुका लढणार,शरद पवारांची माहिती

रयत शिक्षण संस्थेकडून सरकारला २.३६ कोटीची मदत, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला धनादेश !

या आधीही जुलै महिन्यात शरद पवार यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. चौकशी आयोगाकडून शरद पवार यांच्यासोबतच तत्कालीन पुणे पोलीस अधीक्षकांना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे.

या हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी नऊ कार्यकर्त्यांना अटक केली होती. आता हिंसाचार झाला तेव्हा राज्यात भाजपाप्रणीत सरकार सत्तेत होते आणि तेव्हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादी या विरोधी पक्षांनी केला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणी आता पुन्हा एकदा २३ फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी