30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयरोहित पवार म्हणाले, आपलं राज्य मागं पडत असल्याचं दुःख होतंय

रोहित पवार म्हणाले, आपलं राज्य मागं पडत असल्याचं दुःख होतंय

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात मोठमोठे उद्योग राज्याबाहेर गेल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत मोठमोठे उद्योग राज्यात आणल्याचा दावा सरकारने केला, मात्र त्यावर देखील जोरदार टीका झाली. शिंदे-फडणवीस सरकार उद्योगधंदे राज्यात आणण्यासाठी अपयशी असल्याची विरोधक करत असतात. आता राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी देखील तामिळनाडू सरकारचे अभिनंदन करत राज्य सरकारवर निशाना साधला आहे.

पॅा चेनची उपकंपनी तामिळनाडूमध्ये सुमारे 281 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त आहे. ही कंपनी नाईके, अदीदास, टिंबरलँड, न्यू बॅलन्स यासारख्या ब्रॅँडसाठी शुज बणविते. पॅा चेन कंपनीच्या उपाध्यक्षांची तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासोबत नुकतीच बैठक झाली. तामिळनाडूमध्ये हि कंपनी मोठी गुंतवणूक करणार आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी, यासंदर्भात ट्विट करुन तामिळनाडू सरकारचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ₹२३०० कोटी गुंतवणुकीचा आणि २०००० युवांना रोजगार देणारा #Pou_Chen कंपनीचा प्रकल्प खेचून आणल्याबद्दल तमिळनाडू सरकारचं अभिनंदन! महाराष्ट्राबद्दल अशा बातम्या दिसत नसल्याने तमिळनाडू सरकारचं अभिनंदन करताना त्यांचा हेवा आणि ईर्ष्याही वाटतेय आणि आपलं राज्य मागं पडत असल्याचं दुःखही होतंय.

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये तामिळनाडू सरकारचे अभिनंदन करताना आपले राज्य मात्र मागे पडत असल्याचे दु्:ख देखील व्यक्त केले आहे. राज्यात येणारे मोठमोठे उद्योग राज्याबाहेर गेल्याने रोजगार निर्मितीची मोठी संधी महाराष्ट्राने गमावली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टिका देखील केली होती. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, आणि टाटा एअरबस असे तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेले. त्यामुळे राज्यातील मोठी गुंतवणूक गेल्याची टीका याआधीच विरोधीपक्षांनी टीका केली होती. आता रोहित पवार यांनी देखील राज्य सरकारवर निशाना साधला आहे.

हे सुद्धा वाचा

खारघरचे बळी : मराठी मीडियाला लोकं शिव्या घालताहेत !

सोशल मीडियावर पैशांचे ज्ञान पाजळणाऱ्या सहायक फौजदाराला लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले

राज ठाकरे हे भाजपने पाळून ठेवलेले पोपट : संजय राऊत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी