31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeमनोरंजनMahesh Babu : सुपरस्टार महेश बाबूच्या आईचे निधन

Mahesh Babu : सुपरस्टार महेश बाबूच्या आईचे निधन

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) याच्या आईचे निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची तब्बेत ठिक नव्हती. त्यांच्यावर हैद्राबादच्या एआईजी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) याच्या आईचे निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची तब्बेत ठिक नव्हती. त्यांच्यावर हैद्राबादच्या एआईजी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. काही काळ त्यांना व्हेंटेलेटरवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या वर्षी महेश बाबूवर दोनदा दु:खाचा डोंगर कोसळला. कारण काही महिन्यांपूर्वीच त्याचा भाऊ रमेश बाबू याचे निधन झाले हाेते.

म‍िळालेल्या महितीनुसार इंदिरा देवी यांचे पार्थिव पद्मालय स्टूडियोमध्ये सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर जुबली हिल्स येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठमोळी अभ‍िनेत्री शिल्पा शिरोडकर बरोबर महेश बाबूंनी लग्न केले आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

महेश बाबूचा पर‍िचय:

महेश बाबूचे नाव महेश घट्टामनेनी असे आहे. त्याचा जन्म 9 ऑगस्ट 1975 मध्ये चेन्नई येथे झाला. तो एक तामिळ अभिनेता आहे. त्याच्या मुलाचे नाव गौतम कृष्ण, तर मुलीचे नाव सितारा असे आहे. त्याचा पहिला चित्रपट ‘ओक्काडू’ हा सुपरहीट ठरला. त्याच्या चित्रपटांचे अनेक भाषांमध्ये रिमीक्स झाले. महेश बाबूचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे.

The song : आभाळभर गाणी गाणाऱ्या गान ‘कोकीळे’ला मिळाली एका चौकात जागा

Memes : जाणून घ्या ! ‘मीम्स’चा इतिहास

Flowers : महिलांसाठी खास : तुमच्या केसात माळलेली फुलं, तुमचं आयुष्य वाढवतील

महेश यांचा ‘मुरारी’ तसेच ‘ओक्काडु’ हे चित्रपट प्रचंड गाजले. ‘अथुडू’, ‘ननेक्कोडाइन’, ‘सरमिंथुडू’, ‘दुकुडू’, ‘स‍िथ‍म्मा’, ‘सारिमल्ले चेटृ’ असे अनेक चित्रपट गाजले. आतापर्यंत त्याला सात नंदी पुरस्कार, पाच‍ फ‍िल्मफेअर, तीन चित्रपट पुरस्कार, तीन अंतरराष्ट्रीय पुरस्कार, भारतीय फ‍िल्म अकादमी पुरस्कार मिळाले. फोर्बेस इंडियाच्या 2012 मध्ये100 सेल‍िब्रिटींच्या यादीमध्ये तो 31 व्या स्थानावर होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी