33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजसर्वोच्च न्यायालयाकडून सुधा भारद्वाज यांना मोठा दिलासा एनआयएला झटका देत ‘ही’ मागणी...

सर्वोच्च न्यायालयाकडून सुधा भारद्वाज यांना मोठा दिलासा एनआयएला झटका देत ‘ही’ मागणी फेटाळली

टीम लय भारी

नवी दिल्ली: सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. एनआयएने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती(Sudha Bharadwaj: Great relief from the Supreme Court)

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पहिल्या सुनावणीतच उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही प्राथमिक कारण दिसत नसल्याचं सांगत याचिका फेटाळली. यामुळे एनआयएला मोठा झटका बसला आहे.

जिओनं पुन्हा लॉन्च केले पाच नवे प्लान; ग्राहकांना होणार फायदा

Samsung ने भारतात लॉंच केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फिचर्स !

एनआयएने सर्वोच्च न्यायालयात याचिका करताना सुधा भारद्वाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या डिफॉल्ट बेलच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. तसेच उच्च न्यायालयाने यूएपीए कायद्याच्या सर्व तरतुदींचा विचार केलेला नाही, असा दावा केला. मात्र, उच्च न्यायालयाने युक्तीवाद ऐकल्यानंतर हा दावा फेटाळला. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करावं असं कोणतंही कारण याचिकेत नसल्याचं म्हटलं.

मुंबई उच्च न्यायालयाने १ डिसेंबरला सुधा भारद्वाज यांना भीमा कोरेगाव प्रकरणात जामीन मंजूर केला. तसेच एनआयए कोर्टाला ८ डिसेंबरला जामिनाच्या अटी-शर्ती निश्चित करण्यास सांगितले. सुधा भारद्वाज यांच्या वकिलाने त्यांच्यावरील यूएपीए अंतर्गत दाखल गुन्ह्याचा खटला चुकीच्या न्यायालयात चालवल्याचा युक्तीवाद करत ‘डिफॉल्ट बेल’ची मागणी केली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने हा निर्णय दिला. सुधा भारद्वाज यांच्याव्यतिरिक्त ८ सहआरोपींची हीच मागणी मात्र न्यायालयाने अमान्य केलीय.

MPSC : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाची जाहिरात प्रसिद्ध, 27 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

Supreme Court rejects NIA’s plea against grant of default bail to Sudha Bharadwaj

सुधा भारद्वाज यांची सुटका निश्चित, ८ डिसेंबरला जामिनाच्या अटी ठरणार

मुंबई उच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज यांना ‘डिफॉल्ट बेल’ मंजूर केल्यानंतर त्यांना ८ डिसेंबरला विशेष एनआयए कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. त्यावेळी त्यांच्या जामीनाच्या अटी-शर्तींवर निर्णय होईल.

यानंतरच त्यांचा तुरुंगाबाहेर पडण्याचा मार्ग स्पष्ट होईल. उच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज यांची डिफॉल्ट बेलची मागणी मान्य करतानाच भीमा कोरगाव प्रकरणातील इतर ८ सहआरोपींची मागणी अमान्य केली. यात महेश राऊत वर्नन गोन्साल्विस, अरुण फरेरा आणि वरावरा राव यांचा समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी