35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeटॉप न्यूजकोरोना लस संशोधनातील 'भीष्माचार्य' काळाच्या पडद्याआड

कोरोना लस संशोधनातील ‘भीष्माचार्य’ काळाच्या पडद्याआड

टीम लय भारी 

पुणे : सीरम इन्स्टिटयूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. ते दीर्घ आजाराने ग्रस्त होते. आज पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं आहे(Dr. Suresh Jadhav, expert of covid vaccine research passes away).

डॉ.सुरेश जाधव यांनी कोरोना लसीच्या संशोधनात त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच सीरम इन्स्टिट्यूटची कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान होते. मुळचे बुलढाण्यात जन्मलेल्या आणि लहानाचे मोठे झालेल्या डॉ.जाधव यांनी नागपूर विद्यापीठातून फार्मसीची पदवी घेतली होती. एक उत्कृष्ट संशोधक, लस निर्मिती आणि प्रशासन या क्षेत्रातील त्यांची उत्कृष्ट कारकीर्द चार दशकांहून अधिक काळ पसरलेली आहे. लसीचे बारकावे समजणाऱ्या जगातील मोजक्या तज्ञांपैकी ते एक होते. त्यामुळे त्यांना भारतीय लस संशोधनातील ‘भीष्माचार्य’ म्हटलं जातं.

Corona vaccine : ‘कोरोना’ लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन गरजेचं, जाणून घ्या प्रक्रिया

देशात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित महाराष्ट्रात; पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण

डॉ. जाधव यांच्या जाण्यामुळे भारतीय वैद्यकिय क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना औषध निर्माण क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राची नवी नियमावली; 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंधने

SII Executive Director Dr Suresh Jadhav, 72, Passes Away In Pune

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी